Share Market : सारा मूड घालवला रे भौ, वर्षाचा शेवट गोड नाहीच, शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स, निफ्टीत आपटी बार

Share Market Crash Today : वर्षाच्या अखेरचा दिवस काही गुंतवणूकदारांसाठी गोड ठरला नाही. शेवटच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण दिसली. परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री सत्र सुरू केले. तर जागतिक बाजारातील कमकुवत सुरुवातीने बाजार गळपाटला.

Share Market : सारा मूड घालवला रे भौ, वर्षाचा शेवट गोड नाहीच, शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स, निफ्टीत आपटी बार
शेअर बाजार कोसळला
Follow us
| Updated on: Dec 31, 2024 | 11:59 AM

Share Market on 31st December : या वर्षाच्या अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली. परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्री सत्रामुळे आणि जागतिक बाजारातील कमकुवत सुरुवातीने शेअर बाजार गळपाटला. वर्षाच्या अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. आज बीएसई सेन्सेक्सची सुरुवातीच्या व्यापार सत्रात 468.14 अंकांनी घसरला. तो घसरून 77,779.99 अंकापर्यंत घसरला. तर एनएसई निफ्टी 117.05 अंकापर्यंत घसरला. तो 23,527.85 अंकावर आला. आता 11:41 वाजता सेन्सेक्स 78.022.16 अंकावर आला. तर निफ्टी 23,594.45 अंकावर व्यापार करत होता.

सेन्सेक्स 30 कंपन्यांमधील टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, झोमॅटो, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. तर कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा मोटर्स आणि टाटा स्टीलचे शेअर वधारले आहेत.

जागतिक बाजाराची स्थिती काय?

हे सुद्धा वाचा

आशियातील बाजारात दक्षिण कोरियातील कॉस्पी आणि चीनमधील शांघाई कम्पोझिटला नुकसान सहन करावे लागले. तर हाँगकाँगचा हँगसँग फायद्यात राहिला. अमेरिकन बाजारात सोमवारी निराशा होती. ब्रेंट क्रुड 0.30 टक्क्यांनी वाढून ते 74.39 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. त्याचा परिणाम दिसून आला. तर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 1,893.16 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर सोमवारी सुट्टी असल्याने वॉल स्ट्रीट बाजारात थोडी घसरण दिसली. गुंतवणूकदार हे नवीन वर्षाच्या मुडमध्ये आहेत. त्यामुळे बाजार सुस्तावलेला दिसला.

3 लाख कोटींचा फटका

वर्षाच्या अखेरच्या सत्रात गुंतवणूकदारांना 3 लाख कोटींचा फटका बसला. बीएसईच्या सूचीबद्ध यादीत मार्केट कॅप 437.82 लाख कोटी रुपयांनी घसरला. गेल्या सत्रावेळी बाजाराचे मूल्य हे 441.35 लाख कोटी रुपये होते. म्हणजे आजच्या सत्रात गुंतवणूकदारांना 3.53 लाख कोटी रुपयांचा फटका बसला.

या शेअरने फिरवले पाणी

वर्षाच्या अखेरच्या सत्रात आयटी सेक्टरच्या शेअरने बाजाराचा मूड घालवला. आयटी शेअरमध्ये मोठे विक्री सत्र सुरू झाल्याने निफ्टी आयटी इंडेक्स जवळपास 1000 अंकांची जबरदस्त घसरण दिसली. याशिवाय बँकिंग, एफएमसीजी, मेटल्स, कंझ्युमर ड्यरेबल्स, हेल्थकेअर, ऊर्जा, मीडिया क्षेत्रातील शेअरमध्ये मोठी घसरण दिसली. तर फार्मा, ऑईल अँड गॅस क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी दिसून आली.

भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?
भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?.
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?.
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.