Share Market : 1 शेअरवर 130 रुपयांचा डिव्हिडंड; पण काय आहे स्टॉकची प्राईस

Stock Market Dividend : SKF India ही कंपनी अनेकांना माहिती आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश जाहीर केला आहे. एका शेअरवर कंपनी 130 रुपयांचा लाभांश देणार आहे. या शेअरची किंमती किती माहिती आहे का?

Share Market : 1 शेअरवर 130 रुपयांचा डिव्हिडंड; पण काय आहे स्टॉकची प्राईस
ब्रोकरेज Sharekhan ने रिटेल चेन डी-मार्ट (D-Mart) मध्ये BUY चा सल्ला दिला आहे. या स्टॉकची टार्गेट प्राईस 5205-5500 रुपये ठेवली आहे. या स्टॉकमध्ये 3-4 आठवड्यात गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला आहे.
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 4:57 PM

SKF ही कंपनी सर्वांनाच माहिती आहे. पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून अनेक कंपन्या शेअर बाजारात एक्स डिव्हिडेंट स्टॉक म्हणून ट्रेड करत आहेत. या कंपन्यांच्या यादीत एसकेएफ इंडिया लिमिटेड ही कंपनी पण आहे. कंपनी एका शेअरवर 130 रुपयांचा लाभांश देत आहे. यापूर्वी पण कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश दिला आहे. यावेळी सुद्धा कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे.

जुलै महिन्यात कधी रेकॉर्ड डेट

कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, 1 शेअरवर कंपनी गुंतवणूकदारांना 130 रुपयांचा लाभांश देईल. कंपनीने लाभांश देण्यासाठी 4 जुलै2024 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांना या कंपनीत गुंतवणूक करायची आहे, त्यांना या तारखेपर्यंत गुंतवणूक करता येईल. त्यांना डिव्हिडंडचा लाभ मिळेल.

हे सुद्धा वाचा

लाभांश देण्याचा मोठा इतिहास

कंपनीने यापूर्वी पण गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 28 जून 2023 रोजी एसकेएफ इंडियाने एक्स डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेंड केला होता. तेव्हा कंपनीने एका शेअरवर 40 रुपयांचा डिव्हिडंड दिला होता. बीएसईवर उपलब्ध डेटा नुसार, 2021 आणि 2022 मध्ये कंपनीने 14.50 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने लाभांश दिला होता. 2020 मध्ये कंपनीने 1 शेअरवर 130 रुपयांचा डिव्हिडंड दिला होता.

शेअर बाजारात दमदार कामगिरी

शुक्रवारी हा शेअर बीएसईवर 0.78 टक्क्यांनी उसळला. हा शेअर शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा 6791.05 रुपयांवर होता. गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 44 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. एक वर्षांपासून हा शेअर होल्ड करुन ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 38.90 टक्क्यांचा लाभ मिळू शकतो. कंपनीचा गेल्या 52 आठवड्यातील उच्चांक 7349 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 4025 रुपये आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 33,573.57 कोटी रुपये आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.