नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारावर (INDIAN SHARE MARKET) दिसून आला. शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदविली गेली. फेडरल रिझर्व्ह बँकेद्वारे (FEDRAL RESERVE BANK) व्याज दरवाढीचे संकेतामुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिला आणि प्रमुख निर्देशांक एक टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. आज (गुरुवारी) सेन्सेक्स 557 अंकांच्या घसरणीसह 59,053 वर पोहोचला. निफ्टी 168 अंकांच्या घसरणीसह 17639 वर बंद झाला. आज सर्वाधिक घसरण मेटल सेक्टर मध्ये दिसून आली. तर फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टर (PHARMA AND HEALTHCARE) तेजीसह बंद झाले. सर्वाधिक घसरणीच्या स्टॉक्समध्ये टायटन (3 टक्के), एचडीएफसी (2.9 टक्के)आणि एचडीएफसी बँक (2.19 टक्के)यांचा समावेश होतो. बीएसईवर 1697 स्टॉक्स मध्ये वाढ दिसून आली. तर 1713 स्टॉक्समध्ये घसरण नोंदविली गेली.
आज (गुरुवारी) फार्मा, रिअल्टी, हेल्थकेअर सेक्टर मध्ये तेजी नोंदविली गेली. मात्र, अपेक्षित वाढीचा टक्का न गाठल्यानं गुंतवणुकदारांची निराशा झाली. तेल व गॅस सेक्टरमध्ये 2.24 टक्के, मेटल आणि उर्जा क्षेत्रात 1.5 टक्के घसरण झाली. मीडिया आणि आयटी सेक्टर इंडेक्स मध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
• अक्सिस बँक (2.38%)
• डिव्हिज् लॅब (1.40%)
• एचयूएल (1.06%)
• डॉ.रेड्डीज लॅब्ज (0.95%)
• आयसीआयसीआय बँक (0.94%)
• अदानी पोर्ट्स (-3.82%)
• टायटन कंपनी (-3.22%)
• एचडीएफसी (-2.89%)
• ओएनजीसी (-2.29%)
• पॉवर ग्रिड कॉर्प (-2.24%)
‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’द्वारे (एनपीसीआय) निर्मित ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ अर्थात ‘यूपीआय’चा वापर करून मोठ्या रकमेच्या शेअर खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शेअर खरेदीसाठी ‘यूपीआय’च्या सहाय्याने पाच लाख रुपयांपर्यंत पेमेंट करण्यास शेअर बाजार नियंत्रक ‘सेबी’नं ग्रीन सिग्नल दिला आहे. ही सुविधा येत्या एक मे पासून लागू होणार आहे.