SHARE MARKET UPDATE: घसरणीचा 2 रा आठवडा, गुंतवणुकदारांत अस्थिरता; कोट्यावधी रुपयांवर पाणी
बजाज फायनान्स, बजाज फायनान्शियल्स सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयआयसीआय बँक (ICICI BANK) मध्ये तेजी दिसून आली. टायटन, विप्रो आणि डॉ.रेड्डी शेअर्समध्ये (Dr. Reddy Shares) सर्वाधिक घसरण झाली.
नवी दिल्ली- सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात घसरण (SHARE MARKET) नोंदविली गेली. आज (शुक्रवारी) सेन्सेक्स मध्ये 153 अंकांची घसरण झाली आणि निफ्टी 67 अंकांच्या घसरणीसह 15293 वर बंद झाला. बँकिंग, मेटल्स, फायनान्शियल्स शेअर्स वधारणीचे ठरले. आज सेन्सेक्सच्या टॉप-30 शेअर्स मधील 11 शेअर्स वधारणीसह आणि 19 स्टॉक्स घसरणीसह बंद झाले. बजाज फायनान्स, बजाज फायनान्शियल्स सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयआयसीआय बँक (ICICI BANK) मध्ये तेजी दिसून आली. टायटन, विप्रो आणि डॉ.रेड्डी शेअर्समध्ये (Dr. Reddy Shares) सर्वाधिक घसरण झाली. शेअर बाजारात सलग दुसरा घसरणीचा आठवडा ठरला. चालू आठवड्यात सेन्सेक्स मध्ये 4.2 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली. आठवड्याच्या आधारावर ओएनजीसी मध्ये 13.60%, टेक महिंद्रा 13.32%, हिंदाल्को 13.27%, विप्रो 11.83% आणि टाटा स्टील मध्ये 11.40 टक्क्यांची घसरण झाली.
शेअर बाजारावर सावट मंदीच!
कोटक सिक्युरिटिजचे इक्विटी रिसर्च हेड श्रीकांत चव्हाण यांनी शेअर बाजारावर व्याजदरातील वाढ आणि महागाईचा वाढता आलेख यांचे दुहेरी सावट आहे. अमेरिका फेडरल रिझर्व्ह बाजारने अपेक्षेच्या पेक्षा व्याज दरात 75 बेसिस अंकांची वाढ झाली आहे. आर्थिक मंदीचं सावट गहिर होत असल्याचं चित्र आहे. आर्थिक मंदीच्या सावटाची भीती गुंतवणुकदारांमध्ये निर्माण झाली आहे. आर्थिक शिथिलतेमुळे तेलाच्या मागणीत घट झाल्यामुळे किंमतीवर मोठा परिणाम झाला आहे.
व्याज दराची धास्ती!
अमेरिका फेडरल रिझर्व्हने महागाईने 40 वर्षांचा उच्चांग गाठल्यानंतर गेल्या 28 वर्षातील व्याजदरात सर्वाधिक वाढ केली आहे. अमेरिकन रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 0.75 टक्के वाढ केली आहे.
गुंतवणुकदारांचे 27 लाख कोटींवर पाणी!
चालू वर्षी शेअर बाजाराची कामगिरी गुंतवणुकदारांसाठी निराशाजनक राहिली आहे. चालू वर्षी शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणुकदारांना तब्बल 27 लाख कोटींवर पाणी सोडावं लागले आहे. 31 जानेवारी 2021 रोजी बीएसई वर लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅप 2,66,00,211.55 कोटी रुपयांचा होता. तर आजच्या तारखेला 16 जून 2022 मार्कट कॅप घसरणीसह 2,38,94,886.41 कोटींवर पोहोचला आहे.