SHARE MARKET : घसरणीचे सलग 6 दिवस, शेअर बाजार गडगडला; मार्केट कॅप डाउन!

आज (शुक्रवारी) सेन्सेक्स 137 अंकांच्या घसरणीसह 52,794 स्तरावर आणि निफ्टी 26 अंकांच्या घसरणीसह 15782 च्या टप्प्यावर बंद झाला. आजच्या व्यवहारात सर्वाधिक घसरण मेटल क्षेत्रामध्ये (Metal Sector) दिसून आली.

SHARE MARKET : घसरणीचे सलग 6 दिवस, शेअर बाजार गडगडला; मार्केट कॅप डाउन!
घसरणीचे सलग 6 दिवस, शेअर बाजार गडगडलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 11:21 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market Update) घसरणीचं सत्र अद्यापही कायम आहे. आठवड्याच्या अखेरच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात तेजी नोंदविली गेली होती. मात्र, कामकाजाच्या अखरेच्या तासात तेजीचं रुपांतर घसरणीत झालं. चालू आठवड्याच्या सहाही दिवस शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज (शुक्रवारी) सेन्सेक्स 137 अंकांच्या घसरणीसह 52,794 स्तरावर आणि निफ्टी 26 अंकांच्या घसरणीसह 15782 च्या टप्प्यावर बंद झाला. आजच्या व्यवहारात सर्वाधिक घसरण मेटल क्षेत्रामध्ये (Metal Sector) दिसून आली. तर ऑटो क्षेत्रामध्ये खरेदीचा जोर कायम राहिला. जागतिक अर्थवर्तृळातील वेगवान घडामोडींमुळे जागतिक गुंतवणुकदारांचा भारतीय शेअर बाजारातून पैशाचा ओघ अद्यापही कायम असल्याचं दिसून आलं. आज बॉम्बे स्टॉक्स एक्सजेंचवर (Bombay Stock Exchenge) सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकूण 241.34 लाख कोटी रुपयांची घसरण झाली.

शेअर बाजार लाईव्ह

शेअर बाजारात तेजीचं रुपांतर घसरणीत दिसून आलं. आज सेन्सेक्सवर 15 स्टॉक्स घसरणीसह बंद झाले. सर्वाधिक घसरण स्टेट बँकेच्या निर्देशांकात झाली. स्टेट बँकेचा स्टॉक 3.76 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. आयसीआयसीआय बँक 2.65 टक्के आणि एनटीपीसी 2.56 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. आजच्या वधारणीचे स्टॉक्समध्ये सनफार्मा 3.76 टक्के, एम अँड एम 2.78 टक्के आणि एचयूएल 2.49 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. आज बॉम्बे स्टॉक एक्स्जेंचवर 2166 स्टॉक्स वधारणीसह बंद झाले. तर 1169 स्टॉक्स घसरणीसह बंद झाले.

क्षेत्रनिहाय कामगिरी

आजच्या व्यवहारादरम्यान सर्वाधिक घसरण मेटल सेक्टरमध्ये दिसून आली. मेटल सेक्टर निर्देशांक 2.08 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. बँकिंग क्षेत्र निर्देशांकात 1.23 टक्के घसरण नोंदविली गेली. फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरमध्ये 1.26 टक्क्यांची घसरण झाली. आयटी, खासगी क्षेत्र बँका आणि बांधकाम क्षेत्र निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो क्षेत्रात सर्वाधिक खरेदी दिसून आली. एफएमसीजी क्षेत्रात 1.84 टक्के, फार्मा क्षेत्रात 1.65 टक्के तेजी दिसून आली.

हे सुद्धा वाचा

नव्या आयपीओची एंट्री

आघाडीची खत उत्पादक कंपनी पारादीप फॉस्फेट्सचा आयपीओ 17 मे ला सार्वजनिक होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून केंद्र सरकार भागीदारी विक्रीच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. आजमितिला पारादीप फॉस्फेट्समध्ये केंद्राची 19.55 टक्के भागीदारी आहे. आयपीओ गुंतवणुकीसाठी 19 मे पर्यंत खुला असणार आहे. या आयपीओसाठी 39-42 रुपयांचा प्राईस ब्रँड निश्चित करण्यात आला आहे. सेबीकडे सादर करण्यात आलेल्या ड्राफ्ट (डीआरएचपी) नुसार अँकर इन्व्हेस्टर्ससाठी आयपीओ 13 मे पर्यंत खुला असणार आहे. पारादीप आयपीओत 1,004 कोटीचे फ्रेश इश्यू समाविष्ट आहे. यासोबतच प्रमोटर्स आणि अन्य शेअर होल्डर्स ऑफर फॉर सेलमध्ये 11.85 कोटी इक्विटी शेअर्सची विक्री करण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.