बाकी सब बुलबुला…केवळ सोने-चांदीच तारणहार; अडचणीत हेच येईल कामाला, कोणी दिला हा सल्ला

Robert Kiyosaki : 'Rich Dad Poor Dad' हे प्रचंड खपाचे पुस्तक तुम्ही वाचले आहे का? अनेकांनी त्याची पारायणे केली आहेत. पुस्तक माणसाचा आरसा असतात, असे म्हणतात. तर या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी हे कर्जाच्या विळख्यात आहेत. पण जगात त्यांचा गुंतवणुकीचा सल्ला आजही मानल्या जातो...

बाकी सब बुलबुला...केवळ सोने-चांदीच तारणहार; अडचणीत हेच येईल कामाला, कोणी दिला हा सल्ला
सोने-चांदी, बिटकॉईनशिवाय बाकी सब बुलबुला
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 10:10 AM

जगात अनेक जण जगण्यासाठी संघर्ष करतात. गेल्या काही वर्षात महागाईचा विस्फोट झाल्यापासून तर मध्यमवर्ग आणि त्याहून श्रीमंतांना पण जगण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामन्य आणि गरिबांचे काय हाल असतील, हे वेगळं सांगायला नको. प्रत्येकाला घर ,कुंटुबकबिल्यासाठी जादा मेहनत घ्यावी लागत आहे. अनेक जण झटपट श्रीमंत होण्यासाठी जमीन, भूखंड, शेअर बाजार, बाँडमध्ये गुंतवणूक करत आहेत. पण ही गुंतवणूक करताना ‘Rich Dad Poor Dad’ या प्रचंड खपाच्या पुस्तकाचे लेखक Robert Kiyosaki यांचा सल्ला अजिबात दुर्लक्षित करु नका, त्यांच्या मते, अजून वाईट काळ यायचा आहे आणि त्यावेळी तुम्हाला परंपरागत गुंतवणूक पद्धतच तारणार आहे.

स्टॉक, बाँड, रिअल इस्टेट स्वाहा

प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचे आर्थिक सल्ले जगातील अनेक लोक गांभीर्याने घेतात. ते अनाहूत सल्ले देतात. त्यांनी यावेळी त्यांच्या ट्विटर(आताचे X) हँडलवरुन गुंतवणुकीसंबंधीचा असाच एक सल्ला दिला आहे. ‘शेअर बाजार, बाँड, रिअल इस्टेट हा बुडबुडा आहे. ते लवकरच क्रॅश होतील. त्यांची किंमत लवकरच जमिनीवर येईल.’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांना दिला मोठा सल्ला

अर्थात त्यांनी जगाला अमेरिकन चष्म्यातून हा सल्ला दिला आहे. अमेरिकेवर कर्जाचा डोंगर चढतच आहे. प्रत्येक 90 दिवसांत अमेरिकेवर 1 ट्र्रिलियन कर्ज वाढत आहे. अमेरिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे अमेरिकेतीलच नाही तर जगभरातील गुंतवणूकदारांनी स्वतःला आधी वाचवावे. सोने-चांदी, बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करावी, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला. शेअर, बाँड, रिअल इस्टेट हा केवळ बुडबुड आहे, तो लवकरच उद्धवस्त होईल. त्यामुळे सोने आणि चांदी, बिटकॉईनच आधार असल्याचा दावा त्यांनी केला.

बिटकॉईन करणार कमाल

Bitcoin संबंधी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, कॅथी वूड यांनी म्हटल्याप्रमाणे, बिटकॉईन 2.3 दशलक्षापर्यंत पोहचणार आहे. वूड हा अत्यंत हुशार माणूस आहे आणि त्याच्या सल्ल्यावर माझा भरवसा आहे. वूड जर योग्य सल्ला देत असेल तर मी बिटकॉईनमध्ये अधिक गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. जगातील तेच श्रीमंत सर्वाधिक सुखी आणि आनंदी आहे, जे वारंवार चुका करतात आणि त्यातून काही तरी धडा घेतात, असे कियोसाकी यांना वाटते.

Rich Dad poor Dad च्या 4 कोटींहून विक्री

‘रिच डॅड पुअर डॅड’ पुस्तकाने खपाचे अनेक उच्चांक गाठले. हे अत्यंत लोकप्रिय पुस्तक ठरले. जगातील अनेक भाषांत त्याचा अनुवाद झाला. Robert Kiyosaki यांनी 1997 मध्ये हे पुस्तक लिहिले होते. तेव्हापासून ते आजगायत या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या आल्या नि हातोहात विक्री झाल्या. जगातील 50 हून अधिक भाषांमध्ये हे पुस्तक छापण्यात आले आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या 4 कोटींहून अधिक प्रतींची विक्री झाली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.