Stock Market : येत्या 4 दिवसात सांभाळून गुंतवणूक करा, शेअर बाजारात त्सुनामी येणार? युद्धचं नाही तर कारणांची ही यादी वाचा
Share Market Crash : शुक्रवारी शेअर बाजारात सलग पाच दिवसांत घसरण दिसली. यादरम्यान सेन्सेक्स 4,147.67 अंकांनी घसरला. तर निफ्टीत 1,201.45 अंकांची घट दिसली. गुंतवणूकदारांचे 16.68 लाख कोटी रुपये स्वाहा झाले. शुक्रवारी NSE Nifty 235.5 अंकांनी घसरून 25,014.6 अंकावर बंद झाला.
गेल्या 5 व्यापारी सत्रात शेअर बाजार धाराशायी झाला. सेन्सेक्स 4100 अंकांहून अधिकने घसरला. तर निफ्टी 1200 हून अधिक अंकांनी आपटला. गुंतवणूकदारांचे या काळात 16 लाख कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले. जून 2022 नंतर शेअर बाजारातील हा सर्वात वाईट आठवडा ठरला. इराण-इस्त्रायल युद्धाचे सावट त्यासाठी कारणीभूत असले तरी इतर कारणं पण या घसरणीला पूरक ठरली. सध्या युद्धाचे ढग गडद आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात सुद्धा शेअर बाजारावर भीतीचे दडपण राहिल हे नक्की आहे.
शेअर बाजार यामुळे घेऊ शकतो लोटांगण
इराण-इस्त्रायल युद्ध : इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने पण प्रतिवार करण्याचा इशारा दिला आहे. योग्य वेळ येताच इराणला धडा शिकवणार असल्याचे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे. इस्त्रायल अमेरिका आणि नाटो देशांच्या मदतीने इराणच्या तेल उत्पादन विहिरींना लक्ष्य करण्याची भीती व्यक्त होत आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेवर थेट हल्ला करत कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. जग तिसऱ्या युद्धाकडे वाटचाल करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर या युद्धाचे परिणाम समोर येतील. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येईल. परदेशी गुंतवणूकदार चीनच्या बाजाराकडे वळतील.
परदेशी गुंतवणूकदारांचे विक्रीचे सत्र : युद्धाचे वारे वाहत असतानाच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून काढता पाय घेतला आहे. अनेक कंपन्यांमधील गुंतवणूक त्यंनी काढून घेतली आहे. शुक्रवारी परदेशी पाहुण्यांनी भारतीय बाजारात जवळपास 9900 कोटी रुपये काढून घेतले. एका आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी 37 हजार कोटी रुपये काढले आहेत.
RBI पतधोरण समितीची बैठक : सोमवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. त्यात पुन्हा एकदा व्याजदर जैसे थे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणताच फायदा होणार नाही. त्यांचा कर्जाचा हप्ता कायम राहील.
हरियाणा निवडणुकीचा निकाल : पुढील आठवड्यात हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येईल. त्याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर दिसून येईल. जर हरियाणात भाजपची हाराकिरी झाली तर शेअर बाजार घसरणीकडे वळण्याची भीती आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये पण भाजपसमोर कडवे आव्हान असल्याने बाजार प्रतिक्रिया देईल.
शुक्रवारी शेअर बाजारात सलग पाच दिवसांत घसरण दिसली. यादरम्यान सेन्सेक्स 4,147.67 अंकांनी घसरला. तर निफ्टीत 1,201.45 अंकांची घट दिसली. गुंतवणूकदारांचे 16.68 लाख कोटी रुपये स्वाहा झाले. शुक्रवारी NSE Nifty 235.5 अंकांनी घसरून 25,014.6 अंकावर बंद झाला. तर बीएसई सेन्सेक्स 808.65 अंकावर घसरून 81,688.45 अंकावर बंद झाला.