Share Market | बुलेट ट्रेनसारखी स्पीड, या शेअरने 6 महिन्यांतच केली 350 टक्क्यांची चढाई

Share Market | सरकारच्या या रेल्वे कंपनीने शेअर बाजारात तुफान आणले आहे. मंगळवारी, 16 जानेवारी रोजी या शेअरमध्ये 12 टक्क्यांहून अधिकचे तेजी आली. हा शेअर 146.69 रुपयांवर पोहचला. ही सरकारची मिनी रत्न कंपनी आहे. गेल्या सहा महिन्यात या कंपनीचा शेअर 350 टक्क्यांनी उसळला.

Share Market | बुलेट ट्रेनसारखी स्पीड, या शेअरने 6 महिन्यांतच केली 350 टक्क्यांची चढाई
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 2:50 PM

नवी दिल्ली | 16 जानेवारी 2024 : केंद्र सरकारची रेल्वे कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा ( IRFC) शेअर बुलेट ट्रेनसारखा उसळला. कंपनीचा शे्र मंगळवारी 12 टक्क्यांच्या तेजीसह 146.69 रुपयांवर पोहचला. सरकारची रेल्वे कंपी आयआरएफसीचा शेअर एका वर्षात उच्चांकावर पोहचला. कंपनचा शेअर सोमवारी 130.11 रुपयांवर बंद झाला होता. IRFC चा शेअर 52 आठवड्यातील निच्चांकीस्तरावर 25.45 रुपयांवर घसरला होता. तर IRFC च्या शेअरमध्ये गेल्या 6 महिन्यांतच 350 टक्क्यांची चढाई केली. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले.

6 महिन्यांतच 350 टक्के चढला शेअर

6 महिन्यांतच आयआरएफसीचा शेअर 350 टक्क्यांवर पोहचला. कंपनीचा शेअर 17 जुलै 2023 रोजी 32.47 रुपयांवर होता. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा शेअर 16 जानेवारी 2023 रोजी 146.69 रुपयांवर पोहचला. कंपनीचा शेअर या कालावधीत 94.36 रुपयांवरुन थेट 146.69 रुपयांवर पोहचला. नंतर तो दुपारी 2:45 वाजेच्या जवळपास 141.15 रुपयांवर पोहचला.

हे सुद्धा वाचा

10 महिन्यात शेअरमध्ये 470 टक्क्यांची तेजी

आयआरएफसीच्या शेअरमध्ये गेल्या 10 महिन्यात जबरदस्त उसळी आली. कंपनीचा शेअर 10 महिन्यात 470 टक्क्यांनी उसळला. आयआरएफसीचा शेअर 28 मार्च 2023 रोजी 24.45 रुपयांवर होता. सरकारी रेल्वे कंपनीचा शेअर 16 जानेवारी 2024 रोजी 146.69 रुपयांवर पोहचला. या वर्षात आतापर्यंत या शेअरमध्ये 45 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये 485 टक्क्यांची तेजी दिसून आली.

1 लाखांचे झाले 1 कोटींहून अधिक

दुसरा एक शेअर SG Mart Ltd चा शेअर तीन वर्षांतच रॉकेट ठरला. पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा संबंधीच्या व्यवसाय असलेल्या या स्मॉलकॅप कंपनीने ही कमाल केली. एसजी मार्टच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले 1 जानेवारी 2021 रोजी हा शेअर अवघ्या 94 रुपयांवर होता. शुक्रवारी, 12 जानेवारी 2024 रोजी हा शेअर 11,371 रुपयांवर पोहचला. जर तीन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाखांची गुंतवणूक केली असती आणि हे शेअर विक्री केले नसते. तर आज गुंतवणूकदारांना 1.2 कोटी रुपयांहून अधिकचा परतावा मिळाला असता. लखपती तीन वर्षातच करोडपती झाले असते.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.