Share Market | 16 वर्षांत 20 वेळा डिव्हिडंट, 980 टक्के रिटर्न, कोणता आहे हा शेअर

Share Market | अदानी समूहातील काही शेअर्सनी गुंतवणूकदारांचे वारे-न्यारे केले आहेत. त्यांना कमाईची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअरविषयी 7 ब्रोकरेज हाऊसेज बुलिश आहेत. त्यांना हा शेअर लंबी रेस का घोडा असल्याचे वाटते.

Share Market | 16 वर्षांत 20 वेळा डिव्हिडंट, 980 टक्के रिटर्न, कोणता आहे हा शेअर
Follow us
| Updated on: Mar 10, 2024 | 9:27 AM

नवी दिल्ली | 10 March 2024 : अदानी समूहाच्या काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठी कमाई करुन दिली. दीर्घकालीन गुंतवणूकीत मोठा नफा मिळवून दिला. यामध्ये अदानी पोर्टसचा अग्रक्रम लागतो. Adani Ports Share ने हिंडनबर्ग अहवालानंतर पण दमदार कामगिरी केली. या शेअरमध्ये एकदम घसरण आली नाही. या शेअरने 2008 मधील मंदीनंतर 980 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला. परतावाच नाही तर लाभांश देण्यात पण हा शेअर सर्वात पुढे आहे. या शेअरने आतापर्यंत 20 वेळा डिव्हिडंट दिला आहे. अदानी पोर्ट्सचा शेअर एकदा स्प्लिट पण झाला आहे. 23 सप्टेंबर, 2010 रोजी हा शेअर 1:5 प्रमाणात 10 रुपयांहून 2 रुपयांत विभाजीत झाला होता.

7 ब्रोकरेज हाऊसेज फिदा

मोठ्या ऑर्डर आणि जोरदार कमाईमुळे अदानी पोर्ट्सचा शेअर तेजीत आला आहे. अदानी पोर्ट्सविषयी 7 ब्रोकरेज हाऊसेज बुलिश आहेत. ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल, एचएसबीसी, मॉर्गन स्टेनली, सीएलएसए आणि जेएम फायनेन्शिअल या शेअरवर फिदा आहेत. अदानी पोर्ट्ससाठी टार्गेट प्राईस 1,500 रुपये देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

शेअरमध्ये तेजी कायम

  • अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र आहे. गेल्या व्यापारी सत्रात यामध्ये एनएसईवर हा शेअर तेजीसह 1,329.55 रुपयांवर बंद झाला. गेल्या एक महिन्यात हा शेअर 6.42 टक्क्यांनी वधारला. गेल्या सहा महिन्यात अदानी पोर्ट्स शेअरने गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिकचा नफा दिला.
  • एक वर्षात या शेअरची किंमत 90 टक्क्यांनी वधारला. तर पाच वर्षांत अदानी समूहाच्या या शेअरने गुंतवणूकदारांना 262 टक्क्यांचा रिटर्न दिला. एनएसईवर 52 आठवड्यातील उच्चांकावर 1356.55 रुपयांवर पोहचला आणि या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 571.55 रुपये आहे.

हा पेनी स्टॉकपण चर्चेत

पेनी स्टॉक, जीटीएल इंन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरची किंमत (GTL Infrastructure Share Price) सध्या 1.85 रुपये इतकी आहे. पण एकाच वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. या शेअरने 115 टक्क्यांचा परतावा दिला आहेर. या छोटुरामवर अनेक बड्या कंपन्या फिदा आहेत. एलआयसीसह सार्वजनिक उपक्रमातील 4 कंपन्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. हा स्टॉक भविष्यातील लंबी रेस का घोडा ठरू शकतो. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक वाढत आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Non Stop LIVE Update
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात.
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?.
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?.
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.