Share Market | शेअर बाजारात आला Pig Butchering Scam, आमिषाला भाळू नका, सावध राहा

Share Market | शेअर बाजारात अनेक सापळे लावलेले असतात. टेलिग्राम, व्हॉट्सअपसह इतर माध्यमातून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ट्रेड करायला लावणे आणि तुम्हाला फसवणे असे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता Pig Butchering Scam आला आहे, काय आहे हे प्रकरण, समजून घ्या.

Share Market | शेअर बाजारात आला Pig Butchering Scam, आमिषाला भाळू नका, सावध राहा
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 10:13 AM

नवी दिल्ली | 18 February 2024 : ऑनलाईन ब्रोकरेज फर्म झिरोधाचे सह सहसंस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. Pig Butchering Scam पासून त्यांनी गुंतवणूकदारांना चार हात दूर राहण्यास सांगितले आहे. खासकरुन भारतीय गुंतवणूकदारांना अडकवून त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचे समोर आल्याने त्यांनी गुंतवणूकदारांना सतर्क, जागरुक राहण्याचे आवाहन केले आहे. काय आहे हा Pig Butchering Scam?

Fishing Website चा वापर

नितीन कामथ यांनी या प्रकाराविषयी माहिती दिली. त्यानुसार, स्कॅमर, फिशिंग वेबसाईट तयार करतात. या वेबसाईट हुबेहुब भारतीय ब्रोकरेज फर्मसारख्या दिसतात. अशा अनेक वेबसाईट सातत्याने तयार करण्यात येत आहे. या संकेतस्थळावरुन गुंतवणुकीचे सल्ले देण्यात येते. चांगला रिटर्न देण्यात येतो. त्यानंतर मोठी रक्कम गुंतवल्यानंतर फसवणूक करण्यात येते.

हे सुद्धा वाचा

चीनमधील भामटे सक्रिय

भारत सरकारने चीनची अनेक कर्ज पुरवठादार एप बंद केल्यानंतर त्यांनी आता हा घोटाळा सुरु केला आहे. चीनमधील भामट्यांनी भारतासह दक्षिण आशियातील काही देशातील गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे. हे भामटे चीन व इतर देशातून बनावट वेबसाईट तयार करत आहेत. अशाप्रकारच्या वेबसाईट आणि एप पण तयार करण्यात आले आहे. त्याआधारे गुंतवणूकदारांची फसवणूक होत आहे.

Pig Butchering Scam म्हणजे काय ?

  1. नितीन कामथ यांनी या फसवणुकीला Pig Butchering Scam असे म्हटले आहे. पिग म्हणजे डुक्कर, तर डुकराला कापण्यापूर्वी, त्याला खाऊ-पिऊ घालण्यात येते. या घोटाळ्यात पण सायबर भामटे हीच पद्धत वापरतात. ते अगोदर गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवतात. नंतर त्यांना चुना लावतात.
  2. गुंतवणूकदारांन सुरुवातीला गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येतो. गुंतवणूकदाराने रक्कम गुंतवली की, त्यांना चांगला परतावा देण्यात येतो. त्यांना अधिक गुंतवणुकीसाठी आणि मोठ्या परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात येते. शेअर ब्रोकर फर्मकडून अशी ऑफर येत असल्याने गुंतवणूकदार जादा आमिषाने गुंतवणूक वाढवतो. एकदा मोठी रक्कम गुंतवली की घात होतो. रक्कम गायब होते.
  3. अनोळखी लिंकवरुन कोणतेही एप डाऊनलोड करु नका. ब्रोकरेज फर्मचेच एप आहे की नाही, वेबसाईट ब्रोकरेज फर्मचीच आहे की नाही, याची खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करु नका. जादा आमिष दाखविणाऱ्या योजनांपासून चार हात दूर राहा.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....