Union Budget Share Market : बजेटपूर्वी शेअर बाजार गडगडल्यावर काय झाले? आकडे पाहुन म्हणाल, क्या बात है!

Union Budget Share Market : बजेटपूर्वी आणि नंतरची शेअर बाजाराची चाल काय? होतो फायदा की खिशाला बसतो फटका

Union Budget Share Market : बजेटपूर्वी शेअर बाजार गडगडल्यावर काय झाले? आकडे पाहुन म्हणाल, क्या बात है!
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 7:14 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करण्यासाठी आता केवळ 10 दिवस उरले आहेत. बजेट तयार करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. गेल्या वर्षीपासून शेअर बाजाराने (Share Market) अनेकदा गुंतवणूकदारांना झटका दिला आहे. यंदाही शेअर बाजाराचा प्रताप सुरुच आहे. आज निर्देशांकाने गुंतवणूकदारांना फटका दिला. निर्देशांक 229 अंकांनी घसरुन 60,628 अंकावर बंद झाला. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण भांडवल 281.8 लाख कोटी रुपये होते. ते घसरुन आता 280.2 लाख कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे एकाच सत्रात गुंतवणूकदारांना 1.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

जागतिक बँकेच्या दाव्यानुसार, सध्या जगभरात मंदीचा परिणाम दिसत आहे. पण या मंदीच्या काळात केवळ भारतच विकास करत असल्याचा दावा जागतिक बँकेने केला आहे. आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेने(OECD) पण भारताच्या बाजूने झुकते माप दिले आहे.

संस्थेच्या ताज्या ‘इकॉनॉमिक आऊटलूक’ अहवालात भारताच्या विकासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार, भारताचा विकास दर 6.6 टक्के असेल आणि आशियातील ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे कौतूक संस्थेने केले आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान अनेक गुंतवणूकदार मंदीच्या आशेने भारतीय शेअर बाजारातून रक्कम काढून ती सोन्यात अथवा इतर पर्यायी योजनांमध्ये गुंतवत आहेत. अर्थसंकल्पापूर्वी बाजार कोसळतो. बाजार गडगडतो. गेल्या दहा वर्षांतील आकड्यांनी मात्र वेगळेच गणित मांडले आहे.

2013 मध्ये बेंचमार्क सेन्सेक्समध्ये 6.2 टक्क्यांची घसरण झाली. तर 2012 मध्ये त्यात 3.8 टक्क्यांची घसरण झाली. 2020 मध्ये ही त्यात 3.8 टक्क्यांची घसरण दिसून आली. 2014 मध्ये बेंचमार्क सेन्सेक्समध्ये 0.8 टक्के तर 2015 मध्ये शेअर निर्देशांक 0.7 टक्के घसरला.

आता 2023-24 मधील केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास काहीच दिवस बाकी आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हद्वारा व्याजदर वाढीची शक्यता आहे. त्याचा बीएसई बेंचमार्कवर परिणाम दिसून येईल.  परदेशी गुंतवणूकदार आता कोणती भूमिका घेता याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मागील 10 अर्थसंकल्पांवर नजर टाकल्यास, पूर्ण 6 बजेट सादर करण्यापूर्वीच्या एक महिन्याअगोदर बाजारात जोरदार तेजी होती. 2016 मध्ये बजेटने एका महिन्यात जोरदार धाव घेतली. बीएसई सेन्सेक्समध्ये 7.5 टक्के वृद्धी दिसून आली. त्यानंतच्या सत्रातही वृद्धी दिसून आली.

बीएसई सेन्सेक्सने 2017 आणि 2018 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी जोरदार प्रदर्शन केले. आकड्यानुसार या काळात क्रमशः 5.7 आणि 6.2 टक्क्यांची आगेकूच केली. तर बेंचमार्क निर्देशांकाने 2021 मध्ये 1.5 टक्के आणि 2019 मध्ये 0.6 टक्के वाढ झाली. 2022 मध्ये निर्देशांक 4.4 टक्क्यांनी वाढला.

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.