Share Market News: 5 लाख कोटी रुपयांचा चुराडा! शेअर बाजारातील पडझडीने आर्थिक नुकसानीचा मोठा फटका

शेअर बाजारातील पडझडीचा फटका टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, इंटसइंड बँक आणि टीसीएस यांना बसलाय.

Share Market News: 5 लाख कोटी रुपयांचा चुराडा! शेअर बाजारातील पडझडीने आर्थिक नुकसानीचा मोठा फटका
अवघ्या काही मिनिटांत मोठं नुकसानImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 11:44 AM

मुंबई : गुरुवारी सकाळी बाजार उघडताच गुंतवणूकदारांना (investors) मोठा झटका बसला. 1 हजारपेक्षा जास्त अंकांनी बाजार (Share Market) कोसळल्याचा फटका गुंतणवूकदारांच्या खिशाला बसलाय. तब्बल 5 लाख कोटी रुपयांचा चुराडा गुरुवारी सकाळी झालेल्या शेअर बाजारातील पडझडीमुळे झाल्याचं दिसून आलंय. जागतिक बाजारातील (International Market) घडामोडींचे परिणाम मुंबई शेअर मार्केटवर दिसून आले. शेअर बाजारात गुरुवारी 1 हजार 154.78 अंकांनी सेन्सेक्स घसरल्यानं गुंतवणूक दारांना मोठा धक्का बसला. त्यामुळे सेन्सेक्स 53 हजारपर्यंत घसरला. याचा थेट परिमाम कंपन्यांच्या मार्केट कॅपवर झाल्या. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप 5 लाख कोटी रुपयांनी गडगडलेत. फक्त सेन्सेक्सच नव्हे तर निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली.

नेमकं किती रुपयांचं नुकसान?

शेअर बाजारातील पडझडीमुळे शेअर मार्केटमधील लिस्टेड कंपन्याच्या भांडवली मूल्यावर परिणाम झाला.

  1. किती कोटी रुपयांचं नुकसान 5,02,731.03 कोटी
  2. आता किती झालं मार्केट कॅप – 2,50,74,714.78 कोटी
  3. हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : शेअर बाजारात मोठी घसरण

कोणत्या कंपन्यांना सर्वाधिक फटका?

शेअर बाजारातील पडझडीचा फटका टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, इंटसइंड बँक आणि टीसीएस यांना बसलाय. फक्त आयटीसी चा शेअर पडझडीमध्ये स्थिरावला होता. शांघाय, हाँगकाँग आणि टोकीय येथील आशियाई बाजारही घसरल्याचा फटका मुंबई शेअर मार्केटवर जाणवलाय.

दरम्यान, बुधवारी अमेरिकेतील स्टॉक एक्स्चेंजमधेही मोठी घट पाहायला मिळाली होती. अमेरिकेतील बाजारात जून 2020 नंतर पुन्हा भीतीदायक स्थिती दिसत असल्याचं जाणकारांचं मत आहे. सध्याच्या घडीला आंतराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत ही 1.63 टक्क्यांनी वाढलीय. प्रति बॅरल 110.89 रुपये डॉलर इतकी किंमत सध्या कच्च्या तेलाची नोंदवण्यात आली आहे.

मात्र आता शेअर बाजारातील पडझडीनंतर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचं चित्रही दिसून येतंय. मोठ्या आर्थिक नुकसानीचा फटका बसल्यानं गुंतवणूकदार कमालीचे धास्तावलेले आहेत.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.