मुंबई : गुरुवारी सकाळी बाजार उघडताच गुंतवणूकदारांना (investors) मोठा झटका बसला. 1 हजारपेक्षा जास्त अंकांनी बाजार (Share Market) कोसळल्याचा फटका गुंतणवूकदारांच्या खिशाला बसलाय. तब्बल 5 लाख कोटी रुपयांचा चुराडा गुरुवारी सकाळी झालेल्या शेअर बाजारातील पडझडीमुळे झाल्याचं दिसून आलंय. जागतिक बाजारातील (International Market) घडामोडींचे परिणाम मुंबई शेअर मार्केटवर दिसून आले. शेअर बाजारात गुरुवारी 1 हजार 154.78 अंकांनी सेन्सेक्स घसरल्यानं गुंतवणूक दारांना मोठा धक्का बसला. त्यामुळे सेन्सेक्स 53 हजारपर्यंत घसरला. याचा थेट परिमाम कंपन्यांच्या मार्केट कॅपवर झाल्या. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप 5 लाख कोटी रुपयांनी गडगडलेत. फक्त सेन्सेक्सच नव्हे तर निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली.
शेअर बाजारातील पडझडीमुळे शेअर मार्केटमधील लिस्टेड कंपन्याच्या भांडवली मूल्यावर परिणाम झाला.
शेअर बाजारातील पडझडीचा फटका टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, इंटसइंड बँक आणि टीसीएस यांना बसलाय. फक्त आयटीसी चा शेअर पडझडीमध्ये स्थिरावला होता. शांघाय, हाँगकाँग आणि टोकीय येथील आशियाई बाजारही घसरल्याचा फटका मुंबई शेअर मार्केटवर जाणवलाय.
दरम्यान, बुधवारी अमेरिकेतील स्टॉक एक्स्चेंजमधेही मोठी घट पाहायला मिळाली होती. अमेरिकेतील बाजारात जून 2020 नंतर पुन्हा भीतीदायक स्थिती दिसत असल्याचं जाणकारांचं मत आहे. सध्याच्या घडीला आंतराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत ही 1.63 टक्क्यांनी वाढलीय. प्रति बॅरल 110.89 रुपये डॉलर इतकी किंमत सध्या कच्च्या तेलाची नोंदवण्यात आली आहे.
मात्र आता शेअर बाजारातील पडझडीनंतर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचं चित्रही दिसून येतंय. मोठ्या आर्थिक नुकसानीचा फटका बसल्यानं गुंतवणूकदार कमालीचे धास्तावलेले आहेत.