नावात ऑक्सिजन असल्याचा असाही फायदा, कंपनीचे दोन महिन्यात शेअर्सचे भाव दुप्पट, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Apr 20, 2021 | 12:26 PM

ज्या कंपन्यांच्या नावामध्ये ऑक्सिजनचा उल्लेख आहे, त्यां कंपन्यांमधील गुंतवणूक वाढली आहे. oxygen name companies investment rises

नावात ऑक्सिजन असल्याचा असाही फायदा, कंपनीचे दोन महिन्यात शेअर्सचे भाव दुप्पट, नेमकं प्रकरण काय?
ऑक्सिजन
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणू संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. देशात रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा फटका शेअर बाजार कोसळल्याचं पाहायला मिळालं होतं. दुसरीकडे ज्या कंपन्यांच्या नावामध्ये ऑक्सिजनचा उल्लेख आहे, त्यां कंपन्यांमधील गुंतवणूक वाढली आहे. गुंतवणूकदार या कंपन्यांमध्ये पैसे लावत आहेत. मात्र, त्या कंपन्यांबाबत वेगळीच गोष्ट समोर आली आहे. (share market news oxygen name companies investment rises due to second wave of coronavirus)

बॉम्बे ऑक्सिजनचा शेअर दुप्पट

ऑक्सिजन तुटवड्याचा परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाला. ज्या कंपन्यांच्या नावामध्ये ऑक्सिजन आहे त्यांच्या शेअरचे भाव वधारले आहेत. बॉम्बे ऑक्सिजन कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. कंपनीचा शेअर मार्च महिन्यापर्यंत 10 हजार होतो. यासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे. बीएसईमध्ये सोमवारी बॉम्बे ऑक्सिजन इन्वेस्टमेंटस लि. चा शेअर 24 हजार 574.85 रुपयांपर्यंत पोहोचला. याकंपनीचे शेअर नियंत्रणात असून त्याच्या लाभाची मर्यादा 5 टक्के पर्यंत असेल.

कंपनीकडून 2019 मध्ये उत्पादन बंद

बॉम्बे ऑक्सिजन कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर त्या कंपनीची स्थापना 3 ऑक्टोबर 1960 झाल्याचा उल्लेख आहे. मात्र, 3 ऑक्टोबरला 2018 ला कंपनींचं नाव बदलून बॉम्बे इन्वेस्टमेंटस असे ठेवण्यात आलं. कंपनीनं त्यांचं औद्योगिक वापरासाठीच्या गॅसचं उत्पादन 2019 मध्येचं बंद केलं आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कंपनीच्या वेबसाईटमध्ये विरोधाभास आहे. कंपन आता ऑक्सिजनची निर्मिती करत नाही. ऑक्सिजन आणि औद्योगिक गॅस निर्मितीबाबत उल्लेख दिसतो.

तिसऱ्या तिमाहीमध्ये फायदा

बीएसईमध्ये या कंपनीची नोंदणी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून आहे. 31 डिसेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीचं उत्पन्न 33.79 कोटी रुपये होते तर त्यांना 31.69 कोटी रुपये फायदा झाला होता. कंपनीचं बाजारमूल्य 368 कोटी रुपये आहे. याशिवाय लिंडे इंडिया, भगवती ऑक्सिजन, नॅशनल ऑक्सिजन कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आढळली आहे. मात्र, या कंपन्या ऑक्सिजनची निर्मिती करत नाहीत.

संबंधित बातम्या:

LIC Policy : दरमहा अवघ्या 500 रुपयांच्या बचतीवर 2 लाखांपर्यंत परतावा, नेमकी योजना काय?

Gold Rate Today | 2 महिन्यांच्या दरवाढीनंतर पुन्हा गडगडले सोन्याचे भाव, जाणून घ्या आजचा दर…

(share market news oxygen name companies investment rises due to second wave of coronavirus)