रंकचा झाला राजा; एका तासातच शेअर बाजारात धक्कादायक उलटफेर, 1 लाखाचे झाले 5 कोटी

Nifty50 : शेअर बाजारात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. कोण केव्हा राजा होईल आणि कोण केव्हा रंक होईल, याची शाश्वती नसते. ज्याला बाजार कळला, त्याने पैसा छापलाच म्हणून समजा. निफ्टी50 ने काल गुंतवणूकदारांना मालामाल केले. रंकाला राजा केले.

रंकचा झाला राजा; एका तासातच शेअर बाजारात धक्कादायक उलटफेर, 1 लाखाचे झाले 5 कोटी
झाला नफाच नफा
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 3:24 PM

शेअर बाजारात काल चमत्कार घडला. निफ्टी50 ने तासभरात 25,400 अंकावर उसळी घेतली. अशी जबरदस्त लाट सेन्सेक्स आणि बँक निफ्टीत सुद्धा दिसून आली. गुरुवारी निफ्टी50 चे अखेरचे सत्र होते. या उसळीमुळे ज्यांनी काल पैसे गुंतवले होते. त्यांना कुबेराचा खजिना मिळाला. केवळ एकाच तासात अनेक रंक राजा झाले. 25 पैशांचा कॉल ऑप्शन 123 रुपयांवर पोहचला. या काळात 49,100 टक्क्यांची झेप घेतली. ज्याने या काळात 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला एक तासातच 4 कोटी 91 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहे. यामध्ये इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे सर्वात प्रचलित माध्यम आहे. यामध्ये तुम्ही शेअर खरेदी करुन तो राखून ठेऊ शकता. तुम्ही एक दिवसापासून ते महिने, वर्षाभरापर्यंत जवळ ठेऊ शकता. तर दुसरा प्रकार हा फ्यूचर अँड ऑप्शन्सचा (F&O) आहे. यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात. फ्युचरमध्ये ट्रेड करण्यासाठी तुम्हाला अधिक पैसा लागतो. तर ऑप्शन्स खरीदीसाठी कमी पैसा लागतो. छोटे गुंतवणूकदार कमी पैसा लावून जास्तीत जास्त नफा मिळवतात. ते ऑप्शनचा पर्याय अधिक निवडतात.

ऑप्शन ट्रेडिगमध्ये तुम्हाला कॉल वा पुट वर पैसा लावावा लागतो. जर तुम्ही कॉल हा पर्याय निवडला आणि बाजारात तेजीचे सक्ष आले तर तुम्हाला मोठा फायदा होतो. तर बाजार घसरला तर तुम्हाला मोठा फटका बसतो. तर पुट खरेदी केला आणि बाजार कोसळला तर तुम्ही मालामाल होता आणि बाजाराने उसळी घेतली तर मग तुमचे मोठे नुकसान होते.

हे सुद्धा वाचा

गुरुवारी कॉलची जादू

गुरुवारी शेअर बाजाराने चांगलीच उसळी घेतली. त्यामुळे या काळात ज्यांनी बाजारात गुंतवणूक केली आणि कॉलचा पर्याय निवडला. त्यांना हजार टक्क्यांचा रिटर्न मिळाला. अर्थात फायद्याचे हे गणित त्याने ट्रेड करायला कुठून सुरुवात केली. त्यावर पण आधारीत आहे. त्यानुसार त्याला फायदा झाला. शेअर बाजारात एक म्हण प्रसिद्ध आहे की कोणी ही तळाशी खरेदी करू शकत नाही तर कोणीही वरील बाजूस विक्री करुन बाहेर पडू शकतो. सर्वच गुंतवणूकदार किंमतीच्या चढउताराच्या सत्रात प्रवेश घेतात आणि नफा अथवा तोटा पदरात घेऊन बाहेर पडतात.

गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा.
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन.
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.