नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी (Nifty) पुढील आठवड्यात 20000 अंकाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. गेल्या सहा आठवड्यात इंट्राडे उच्चांकावर पोहचले आहे. बँकिंग शेअरमध्ये गुंतवणूकदारांचा मोर्चा वळला आहे. बँक निफ्टीने निफ्टीमध्ये जोरदार प्रदर्शन केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वाढीव रोख राखीव प्रमाण(ICRR) बंद करण्याची करण्याची घोषणा केली आहे. 10 टक्के आयसीआरआर बँकांची निव्वळ मागणी आणि वेळेत कर्ज चुकविण्यासाठीचा हिस्सा आरबीआयकडे जमा असतो. त्यावर बँकांना कोणताही व्याज मिळत नाही. या चांगल्या संकेतामुळे निफ्टी पुढील टप्पा गाठण्याची शक्यता आहे. निफ्टी 20,000 अंकांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काय आहे यामागील कारणं
कामगिरी चांगली
निफ्टी गेल्या सत्रात अर्धा टक्क्यांनी वाढला. निफ्टी 19819.95 अंकावर बंद झाला. 20 जुलैनंतर हा सर्वात उच्चांकी धाव होती. बँक निफ्टी 0.6% वाढून 45156.40 अंकावर पोहचला. आरबीआयकडून 7 ऑक्टोबरपर्यंत आयसीआरआर बंद करण्याच्या वृत्ताने 9 आठवड्यातील सर्वात उच्चांक गाठला. लाईव्हमिंटच्या वृत्तानुसार, सॉफ्ट निफ्टी इंडेक्स पुढील आठवड्यात 19991.85 अंकाच्या उच्चांकावर पोहचेल आणि नंतर 20,000 अंकाचा स्तर गाठेल. 30 नोव्हेंबरच्या वायदे बाजार करारानुसार, तो 20,088 अंकावर बंद झाला आहे.
ही पण आहेत कारणे
आरबीआयने वाढीव रोख राखीव प्रमाणचा निर्णय घेतल्याचा पथ्यावर पडला आहे. 2,000 रुपयांच्या नोटा माघारी बोलवल्या आहेत. त्याचा फायदा होईल. अतिरिक्त तरलता आल्याचा ही फायदा दिसून येत आहे. जागतिक संकेतामुळे इंडेक्स सात आठवड्यांच्या सर्वात उच्चांकावर आहे. तर सर्वकालीन उच्चांक गाठण्यासाठी त्याला 172 अंकाची गरज आहे. याशिवाय सुरक्षा, शिपिंग स्टॉकचे निकाल पथ्यावर पडू शकतात.
या घाडमोडी पण पथ्यावर
मान्सून सक्रिय झाला आहे. जी20 संमेलन याचा चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. निफ्टी 20,000 अंकाची चढाई करण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार एचडीएफसी बँक आणि रिलायन्स सारखे शेअर मोठी कामगिरी बजावू शकतो. निफ्टीतील टॉप शेअर कोल इंडिया, एनटीपीस, बीपीसीएल, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो या शेअरमध्ये तीन टक्क्यांपर्यंत उसळी दिसून आली. तर अल्ट्राटेक सिमेंट, आईटीसी, विप्रो, टेकएम आणि टाटा स्टील चार टक्क्यांपर्यंत घसरला.
असे वाढले मार्केट कॅप
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 31 ऑगस्ट रोजी 309.6 लाख कोटी रुपये होते. ते शुक्रवारी वाढून 320.9 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. सहा दिवसांत गुंतवणूकदारांनी 11.3 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम कमावली. गुंतवणूकदारांना जवळपास 1.8 लाख कोटींचा फायदा झाला. मागील सत्रात बीएसई-लिस्टिड कंपन्यांचे मार्केट कॅप 319.1 लाख कोटी रुपये होते.