Share Market | हा आहे जगातील सर्वात महत्वाचा Stock; गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे वारे झाले न्यारे

Share Market | NVIDIA मुळे अमेरिकन बाजारात तेजी आली आहे. या कंपनीने त्यांच्या चौथ्या तिमाहीचा निकाल घोषीत केला आहे. हा निकाल उत्साहवर्धक आहे. चौथ्या तिमाहीत एनव्हिडियाने 22.1 अब्ज डॉलरचा महसूल गोळा केला आहे. तर 5.16 डॉलर EPS नोंदवला आहे. यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा हे आकडे अधिक आहे.

Share Market | हा आहे जगातील सर्वात महत्वाचा Stock; गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे वारे झाले न्यारे
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 11:22 AM

नवी दिल्ली | 23 February 2024 : चिप तयार करणारी कंपनी एनव्हिडिया (NVIDIA) सध्या चर्चेत आहे. कंपनीचा शेअर कमाल करत आहे. हा शेअर सूसाट सुटला आहे. त्याची बाजारातील गती पाहता, अमेरिकेतील दिग्गज वित्तसंस्था गोल्डमॅन सॅक्सने (Goldman Sachs) या शेअरला पृथ्वीवरील सर्वात महत्वपूर्ण स्टॉक म्हणून जाहीर केले आहे. Chip Manufacturer एनव्हिडियाने काही दिवसांपूर्वीच बाजारातील मोठी कंपनी गुगलला बाजारातील भांडवलाआधारे मागे टाकले आहे. कंपनीच्या शेअरने अमेरिकन शेअर बाजारात चैतन्याचे वातावरण संचारले आहे. बाजाराने पण मरगळ झटकली आहे.

Amazon-Google ला टाकले मागे

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, AI Chip निर्माता कंपनीने गेल्या वर्षभरात जोरदार आगेकूच केली. तर यावर्षात, 2024 मध्ये नॅस्डॅक 100 इंडेक्सच्या आतापर्यंतची जोरदार घौडदौड केली आहे. या महिन्यात या कंपनीने अजून एक जोरदार कामगिरी बजावली. एनव्हिडियाने गेल्या आठवड्यात मंगळवारी मोठी झेप घेतली. कंपनीचे मार्केट कॅप सर्वाधिक वाढले. या कंपनीने गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंक आणि दिग्गज ई-कॉमर्स कंपनी Amazon ला पिछाडीवर टाकले. कंपनीचे बाजारातील भांडवल वाढून 1.78 ट्रिलियन डॉलरवर पोहचले. भारतीय चलनात ही रक्कम 14755016,30,00,000 कोटी रुपये इतकी होते.

हे सुद्धा वाचा

टेस्ला पण पडली मागे

कंपनीचे शेअर्सने जोरदार कामगिरी बजावली. गेल्या एका वर्षात या कंपनीचा शेअर 225 टक्क्यांनी उसळला. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये या वर्षात 650 अब्ज डॉलरची तेजी आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत कंपनी टेस्लाच्या एकूण भांडवलापेक्षा ही रक्कम अधिक आहे. इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे मार्केट कॅप 586.06 अब्ज डॉलर इतके आहे. एलॉन मस्क हा टेस्लाचा मालक आहे.

अशी झाली होती सुरुवात

तैवानचे जेनसन हुआंग यांनी NVIDIA स्थापन केली होत. त्यांनी 1993 मध्ये ही कंपनी सुरुवात केली होती. सुरुवातीला ही कंपनी  व्हिडिओ गेम ग्राफिक्स चिप्स तयार करण्याचे काम कंपनी करत होती. त्यानंतर चिप्सचा वापर वाढला. कंपनीने रॉकेट भरारी घेतली. कंपनीचे बाजारातील शेअर वाढला. कंपनीच्या संस्थापकाची संपत्ती वाढली.

Non Stop LIVE Update
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत.
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?.
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'.
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.