Share Market | Olectra Greentech शेअरची कमाल! तिप्पट झाला पैसा एकाच वर्षात

Olectra Greentech Share | ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने धमाल केली आहे. या शेअरने आज बाजाराच्या अखेरच्या सत्रात कमाल केली आहे. या शेअरमध्ये 9 टक्क्यांची उसळी आली आहे. त्यामुळे कंपनीचा शेअर NSE वर 2048 रुपयांवर पोहचला आहे. ही या शेअरची उच्चांकी कामगिरी आहे.

Share Market | Olectra Greentech शेअरची कमाल! तिप्पट झाला पैसा एकाच वर्षात
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 3:57 PM

नवी दिल्ली | 9 February 2024 : इलेक्ट्रिक बस तयारी करणारी कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक (Olectra Greentech) कंपनीचा शेअर सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या शेअरने जोरदार परतावा दिला आहे. शुक्रवारी, या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात या शेअरमध्ये 9 टक्क्यांची उसळी दिसून आली. त्यानंतर कंपनीच्या शेअरने NSE मध्ये 2048 रुपयांची रेकॉर्ड उच्चांकी झेप घेतली. गेल्या 3 महिन्यात कंपनीच्या ईव्ही स्टॉक्सच्या शेअरमध्ये 70 टक्क्यांची तेजी दिसून आली. सध्या ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीकडे 7000 हून अधिक इलेक्ट्रिक बस तयार करण्याची ऑर्डर आहे.

7000 हून अधिक बसची ऑर्डर

कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला BEST, TSRTC, MSRTC कडून इलेक्ट्रिक बस तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. TSRTC ने ओलेक्ट्रा ग्रीनटेकला 550 बस तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. तर बेस्टने 2100 बस तर MSRTC ने 5150 बस तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. म्हणजे सध्या या कंपनीकडे 7000 हून अधिक इलेक्ट्रिक बस तयार करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे कंपनीचा शेअर बाजारात उसळी घेत आहे.

हे सुद्धा वाचा

या सेंगमेंटवर कंपनीचे लक्ष

इलेक्ट्रिक बस सेगमेंटमध्ये ही कंपनी जोरदार कामगिरी बजावत आहे. पण कंपनीचे लक्ष तीनचाकी वाहन बाजारावर आहे. कंपनी ऑटो आणि इलेक्ट्रिक ट्रक सेगमेंटवर फोकस करत आहे. या महिन्यात ओलेक्ट्रा ग्रीन रिलायन्सच्या मदतीने हायड्रोजन बस बाजारात आणली आहे.

कंपनीची आर्थिक परिस्थिती कशी?

डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 27 कोटी रुपये होता. तर एक वर्षापूर्वी या कंपनीचा तिमाहीत निव्वळ नफा 15 कोटी रुपयांपर्यंत होता. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या दरम्यान कंपनीचा एकूण महसूल 342 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर या महसूलात 33.6 टक्क्यांची भर पडली आहे.

एका वर्षात तिप्पट पैसा

गेल्य सहा महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 80 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर केवळ एका वर्षात गुंतवणूकदारांना 320 टक्क्यांचा फायदा झाला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 16,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. गुंतवणूकदारांना एकाच वर्षात तिप्पट पैसा मिळाला आहे. हा शेअर त्यांच्यासाठी मल्टिबॅगर ठरला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.