Share Market | एका वडापावच्या किंमतीत 5 शेअर! 6 महिन्यांतच गुंतवणूकदारांना दाखवला ‘चमत्कार’

| Updated on: Jan 12, 2024 | 10:17 AM

Share Market | शेअर बाजारात काही छोटूराम चमत्कार दाखविल्याशिवाय राहत नाही. यामधील गुंतवणूक जोखिमची असली तरी, योग्यवेळी डाव लावल्यास तुम्ही मालामाल होऊ शकतात. नावातच चमत्कार असलेल्या या पाच रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या शेअरने असाच चमत्कार करुन दाखवला आहे.

Share Market | एका वडापावच्या किंमतीत 5 शेअर! 6 महिन्यांतच गुंतवणूकदारांना दाखवला चमत्कार
Follow us on

नवी दिल्ली | 12 जानेवारी 2024 : शेअर बाजारात हजारो कंपन्या आहेत. त्यातील काही कंपन्यांच्या शेअरची किंमत तर 5 रुपयांपेक्षा कमी आहे. हे शेअर अर्थातच पेनी स्टॉक म्हणून ओळखले जातात. गुरुवारी शेअर बाजारात चढउताराचे सत्र होते. पण एका पेनी शेअरने या ही परिस्थितीत रॉकेट भरारी घेतली. या शेअरमध्ये आठवड्याच्या चौथ्या दिवशी पण 15 टक्क्यांची तर आज सकाळी 10:03 वाजता 8.68 टक्क्यांची वाढ दिसून आली. या कंपनीचे पूर्वी चमत्कार असे नाव होते. तिने चमत्कारच दाखवला आहे. CNI Research असे या कंपनीचे नवीन नाव आहे.

काय आहे शेअरची किंमत

गुरुवारी CNI Research चा शेअर 3.34 रुपयांवर बंद झाला. एक दिवसापूर्वी हा शेअर 10.96 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान या शेअरची किंमत 3.61 रुपये होती. या छोटूराम शेअरने आज सकाळी 3.70 रुपयांपर्यंत झेप घेतली. हा शेअर त्याच्या 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचला आहे. हा शेअर एप्रिल 2023 मध्ये 1.61 रुपयांवर होता. गेल्या सहा महिन्यात बीएसई सेन्सेक्सवर या शेअरने गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर एक, तीन महिने आणि वार्षिक आधारावर त्याने दुप्पट परतावा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

कोणाकडे किती शेअर

सीएनआय रिसर्च लिमिटेडच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर्सकडे 37.11 टक्के तर गुंतवणूकदारांकडे 62.89 टक्के शेअर्स आहेत. वैयक्तिक प्रमोटर्समध्ये किशोर पुनमचंद ओसवाल आणि संगिता ओसवाल यांच्याकडे एकूण 2,21,31,346 शेअर आहेत. या कंपनीने गेल्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

कंपनीने बदलले नाव

कंपनीचे पूर्वीचे नाव चमत्कार होते. त्यानंतर हे नाव सीएनआय रिसर्च लिमिटेड असे करण्यात आले. कंपनीने नाव बदलानंतर जागतिक स्तरावर व्यवसायाचा विस्तार केला. अनेक जागतिक कंपन्यांशी या कंपनीने करार केला आहे. रॉयटर्स, डाऊ जॉन्स यांच्यासह इतर ब्रँडसोबत या कंपनीने करार केला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.