Share Market | शेअर बाजार सूसाट, Sensex ने ओलांडला 1000 अंकाचा टप्पा

Share Market | BSE सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना आनंदवार्ता दिली. सकाळी 9:15 वाजता निर्देशांक 656.84 अंकाने उसळला. तो 70,241.44 अंकावर उघडला. तर NSE Nifty मध्ये 187.30 अंकांची तेजी आली. निफ्टी 21,113.60 अंकावर पोहचला. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजीचे सत्र आहे. गेल्या आठवड्यात या तेजीला मोठा ब्रेक लागला होता.

Share Market | शेअर बाजार सूसाट, Sensex ने ओलांडला 1000 अंकाचा टप्पा
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 4:04 PM

नवी दिल्ली | 14 डिसेंबर 2023 : भारतीय शेअर बाजाराचा वारु पुन्हा उधळला गेला आहे. बाजार आज हिरव्या रंगाने न्हाऊन निघाला. दोन्ही इंडेक्स नवीन रेकॉर्ड स्तरावर पोहचले. Sensex ने 1000 अंकाहून अधिकची उसळी घेतली. हा निर्देशांक 70,602.89 अंकावर पोहचला. तर NSE Nifty मध्ये 187.30 अंकांची तेजी आली. निफ्टी 21,210.90 अंकावर पोहचला. यापूर्वी बुधवारी सेन्सेक्स 69,584.60 स्तरावर बंद झाला होता. निफ्टी-50, 255.40 अंकांच्या तेजीसह 21,181.70 वर ट्रेड करत होता.

तेजीनंतर इंडेक्स झाला रॉकेट

बीएसई निर्देशांकाने गुरुवारी सकाळी 9:15 वाजता 656.84 अंकाची उसळी घेतलीम. तो 70,241.44 अंकावर उघडला. तर NSE Nifty मध्ये 187.30 अंकांची तेजी आली. निफ्टी 21,113.60 अंकावर पोहचला. बाजार उघडताच जवळपास 1952 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर 353 शेअर लाल निशाणीवर होते. याशिवाय 70 शेअरमध्ये कुठलाही बदल दिसून आला नाही. अर्ध्या तासाच्या व्यापारी सत्रात सेन्सेक्स 900 अंकांनी उसळला आणि त्याने नवीन ऑल टाईम उच्चांकी स्तर गाठला.

हे सुद्धा वाचा

या शेअरमध्ये तेजीचे सत्र

IRFC च्या शेअरमध्ये ताबडतोब कमाई झाली. या शेअरने 12 टक्क्यांची उसळी घेतली. याशिवाय Tech Mahindra, Larsen and Turbo, Infosys, HCL Tech, Bajaj Finance, InfoAge, Adani Green Energy, DLF या शेअर्समध्ये पण मोठी तेजी दिसून आली. तर सरकारी कंपन्यांच्या दबदबा आजही कायम दिसला. या शेअर्सनी मोठी उसळी घेतली. या शेअर्सने छप्परफाड परतावा दिला. ग्राहकांना आज इन्ट्राडेमध्ये कमाई करता आली.

अमेरिकेतील बातमीचा परिणाम

भारतीय शेअर बाजारातील या तेजीमागे अमेरिकेतील बातमीचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकन केंद्रीय बँक फेड रिझर्व्हने बुधवारी पॉलिसी रेट कायम ठेवण्याचे जाहीर केले. म्हणजे व्याजदरात कुठलाही बदल न करण्याची भूमिका घेतली. सलग तिसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्यात यश मिळवले. तर नवीन वर्षात व्याज दरात कपातीचे संकेत दिले आहे. या बातमीचा अनुकूल परिणाम बाजारावर दिसून आला. नवीन वर्षात 2024 मध्ये व्याजदरात 0.75 टक्क्यांच्या कपातीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या हा व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.