Share Market | हिंडनबर्गचा असा पण धसका; SEBI ने बदलला हा नियम, काय होईल परिणाम

Share Market | हिंडनबर्गने गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच अंबानी समूहावर बॉम्बगोळा टाकला. त्यानंतर आता एका वर्षानंतर सेबीने शेअर बाजारातील एक खास नियम बदलला आहे.काय होता हा नियम, त्याचा बाजारावर आणि गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल? याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न घोळत आहेत..

Share Market | हिंडनबर्गचा असा पण धसका; SEBI ने बदलला हा नियम, काय होईल परिणाम
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 2:30 PM

नवी दिल्ली | 6 जानेवारी 2024 : शेअर बाजाराचे नियंत्रण करणारी संस्था सेबीने (SEBI) एक मोठं पाऊल उचले आहे. सेबीने बाजारातील नेकेड शॉर्ट सेलिंगला (Naked Short Selling) बंदी घातली आहे. पण सेबीने सर्वसामान्य गुंतवणूकदार सह इतर श्रेणीतील गुंतवणूकदारांना शॉर्ट सेलिंगची परवानगी दिली आहे. पण ते नेकेड शॉर्ट सेलिंग करु शकणार नाहीत. सेबीने हा निर्णय, हिंडनबर्ग आणि अदानी समूहातील वादाच्या एका वर्षानंतर घेतला हे विशेष. आता यामागील समीकरणं काय आहेत. त्याचा परिणाम काय होईल, हे पाहुयात..

नो नेकेड शॉर्ट सेलिंग

सेबीने सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांना फ्यूचर ऑप्शनमध्ये स्टॉक ट्रेडिंगमध्ये शॉर्ट सेलिंगला परवानगी दिली आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पण याची अनुमती देण्यात आली आहे. शॉर्ट सेलिंग फ्रेमवर्कविषयी सेबीने स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यानुसार, संस्था नेकेड शॉर्ट-सेलिंगला परवानगी देणार नाही. Naked Short Selling मध्ये  ट्रेडर त्याच्याकडील अशा शेअरची विक्री करतो, जे त्याने कधी खरेदीच केलेले नसतात. अशा ट्रेडर्सकडे कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नसते. पण आता ट्रेडरला असा व्यवहार करता येणार नाही. त्याला नेकेड शॉर्ट सेलिंग करता येणार नाही.

हे सुद्धा वाचा

अगोदरच करावा लागेल खुलासा

सेबीने याविषयीचा खुलासा केला आहे. त्यानुसार, फ्युचर-ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असाल अथवा एखाद्या स्टॉकचे शॉर्ट सेल करत असाल तर अशावेळी गुंतवणूकदारांना खुलासा करावा लागेल. त्याला डिक्लेयरेशन करावे लागेल. हा व्यवहार शॉर्ट-सेल आहे की नाही, याची माहिती ऑर्डर नोंदवताना द्यावी लागेल. यासंबंधीची माहिती दिल्याशिवाय ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही.

काय असते शॉर्ट सेलिंग

शॉर्ट सेलिंगमध्ये गुंतवणूकदारांना त्या स्टॉकची विक्री करण्याची परवानगी देण्यात येते, जो ट्रेडिंगदरम्यान अस्तित्वात नसतो. अशा व्यवहारात शॉर्ट सेलिंगमध्ये गुंतवणूकदार सर्वात अगोदर उधार घेतो आणि नंतर स्टॉकची विक्री करतो. तर नेकेड शॉर्ट सेलिंगमध्ये असे होत नाही. नेकेड शॉर्ट सेलिंगमध्ये ट्रेडर उधारी न करताच ट्रेड करतो. याचा अर्थ ट्रेडर त्याच्याकडील अशा शेअरची विक्री करतो, जे त्याने कधी खरेदीच केलेले नसतात.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.