Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : सेन्सेक्स करणार कमाल! 70,000 चा करणार रेकॉर्ड, विजय केडिया यांचा सल्ला काय

Share Market : दिग्गज इक्विटी गुंतवणूकदार विजय केडिया यांची बीएसईच्या यादीत 15 कंपन्यांमध्ये एक एक टक्क्यांपेक्षा अधिकची हिस्सेदारी आहे. बेंचमार्क इक्विटी इंडेक्स BSE Sensex चालू कॅलेंडर वर्षाच्या शेवटपर्यंत 70,000 अंकाचा पल्ला सहज गाठेल, असा दावा त्यांनी केला आहे.

Share Market : सेन्सेक्स करणार कमाल! 70,000 चा करणार रेकॉर्ड, विजय केडिया यांचा सल्ला काय
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 7:22 PM

नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : शेअर बाजार (Share Market ) लवकरच नवीन उच्चांक गाठणार आहे. गेल्या जुलै महिन्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअरांच्या इंडेक्स सेन्सेक्सने 66,000 अंकांचा ऐतिहासिक टप्पा नुकताच गाठला होता. शेअर बाजारातील ही तेजी अशीच कायम राहिल, असा दावा दिग्गज इक्विटी गुंतवणूकदार विजय केडिया (Vijay Kedia) यांनी केला. त्यांची बीएसईच्या यादीत 15 कंपन्यांमध्ये एक एक टक्क्यांपेक्षा अधिकची हिस्सेदारी आहे. बेंचमार्क इक्विटी इंडेक्स BSE Sensex चालू कॅलेंडर वर्षाच्या शेवटपर्यंत 70,000 अंकाचा पल्ला सहज गाठेल, असा दावा त्यांनी केला आहे. पण या दोन शेअरपासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.

15 कंपन्यांमध्ये हिस्सेदारी

विजय केडिया हे दिग्गज गुंतवणूकदार आहेत. त्यांची बीएसईच्या 15 कंपन्यांमध्ये एक एक टक्का हिस्सेदारी आहे. सोमवारी, 7 ऑगस्ट रोजी सेन्सेक्सने 65,953 अंकाचा टप्पा गाठला होता. बेंचमार्क इक्विटी इंडेक्स BSE Sensex चालू कॅलेंडर वर्षाच्या शेवटपर्यंत 70,000 अंकाचा पल्ला सहज गाठेल, असा दावा केडिया करत आहेत. वार्षिक आधारावर सेन्सेक्स 8 टक्क्यांची वाढ दाखवत आहे.

हे सुद्धा वाचा

परेदशी पाहुण्यांनी ओतला पैसा

परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) यावर्षी 1 जानेवारीपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा ओतला आहे. परदेशी पाहुण्यांनी इक्विटी बाजारात 1.21 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशातील गुंतवणूकदार संस्थांनी याच कालावधीत 87,491 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

केडिया यांची या क्षेत्रात गुंतवणूक

शेअर बाजारात काही सेक्टरमध्ये बुमिंग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे. विजय केडिया यांनी सांगितले की, दोन्ही सेक्टरवर गुंतवणूकदार त्यांचा निर्णय घेऊ शकतात. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका यामध्ये येत्या काही दिवसांत मोठी वाढ दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. टेलिकॉम सेक्टरमध्ये पण येत्या काही दिवसांत मोठा उलाढाल होईल, असा दावा त्यांनी केला.

कॅपिटल गुड्स इंडेक्स काय सांगतो

बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 7 ऑगस्टपर्यंत सर्वात जास्त 30 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. बीएसई रिअॅलिटी, हेल्थकेअर, ऑटो आणि एफएमसीजी इंडेक्समध्ये क्रमशः 26%, 23%, 22%, आणि 17% वृद्धी दिसून आली. टेलिकॉम, आयटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, मेटल्स आणि बँकिंग सेक्टरमध्ये आतापर्यंत 4 ते 9 टक्क्यांची वृद्धी दिसून आली.

काय दिला सल्ला

विजय केडिया यांनी या दोन सेक्टरपासून चार हात लांब राहण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. AI तंत्रज्ञनामुळे माहिती तंत्रज्ञान (IT Sector) क्षेत्रापासून चार हात लांब रहा. तर जागतिक बाजारातील ट्रेंड पाहता धातू क्षेत्रापासून (Metal Sectors) दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

सूचना : टीव्ही9 मराठी, गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा गुंतवणूकीचा सल्ला देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्या.

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.