Share Market | ‘सिंघम’ ला शेअर बाजाराची भुरळ! या कंपनीत गुंतवले कोट्यवधी रुपये

Share Market | शेअर बाजारात सिंघमची एंट्री झाली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह क्रिकेटर्सनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. काहींनी स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. या यादीत अजय देवगणचे पण नाव जोडल्या गेले आहेत. या कंपनीत त्याने पैसा गुंतवला आहे.

Share Market | 'सिंघम' ला शेअर बाजाराची भुरळ! या कंपनीत गुंतवले कोट्यवधी रुपये
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 11:06 AM

नवी दिल्ली | 3 March 2024 : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याची शेअर बाजारत एंट्री झाली आहे. त्याने गे्ल्या एका वर्षात 860 टक्क्यांहून अधिक रिटर्न देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. .या कंपनीत त्याने 2.74 कोटींची गुंतवणूक केली आहे. अजय देवगण याने पॅनोरमा स्टुडियोज इंटरनॅशनल या कंपनीत ही गुंतवणूक केली. 274 रुपये प्रति शेअरप्रमाणे त्याने खरेदी केली. याशिवाय इतर 8 हून अधिक लोकांनी प्रेफेरेंशिअल शेअर प्रमाणे कंपनीत गुंतवणूक केली आहे. या कंपनीत 9 गुंतवणूकदारांनी एकूण 24.66 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे.

अशी आहे दमदार कामगिरी

या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 970 रुपये आहे. सध्या हा शेअर 949 रुपयांवर ट्रेड करत आहे. शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 91 रुपये आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअरने 271 टक्क्यांची चढाई केली आहे. तर एका वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांना 861टक्क्यांचा परतावा दिला आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना 8 पटीहून अधिकचा परतावा दिला आहे. त्यामुळे एकाच वर्षात गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

काय करते ही कंपनी

पॅनोरमा स्टुडियोज इंटरनॅशनल, सिनेमा निर्मिती आणि वितरणाचे काम करते. ही कंपनी कुमार मंगत पाठक यांनी स्थापन केली आहे. ते अजय देवगण यांचे चांगेल मित्र आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगण आणि पाठक गेल्या 25 वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. ओमकारा, दृश्यम, सेक्शन 375, बाजार, गब्बर इज बॅक, आक्रोश, रुस्तम आणि खुदा हाफिज सारख्या चित्रपटाची निर्मिती पॅनोरमा स्टुडियोजने केली आहे.

कंपनीचे मार्केट कॅप

या कंपनीच्या महसूलात आणि नफ्यात सातत्याने घसरण दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीला 34 कोटी रुपयांचा महसूल आणि 2 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर एका वर्षाच्या समान कालावधीत या कंपनीला 197 कोटींचा महसूल आणि 33 कोटींचा नफा झाला होता. या कंपनीचे मार्केट कॅप 1180 कोटी रुपये आहे. कंपनीचे नेटवर्थ 69 कोटी रुपये आहे. हा शेअर बीएसईवर उपलब्ध आहे. या कंपनीची स्थापना 1980 मध्ये करण्यात आली होती.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.