Share Market : एक्झिट पोलच्या दाव्यांना परदेशी पाहुण्यांचा ठेंगा, लोकसभा निकालापूर्वीच शेअर बाजारातून इतके कोटी नेले मायदेशी

Foreign Portfolio Investors : लोकसभा निकाल आता तोंडावर येऊन ठेपला आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपच्या बाजूने कौल आलेला आहे. पण परदेशी पाहुण्यांनी 20 वर्षांतील सर्वात मोठा धक्का दिला. शेअर बाजाराला अनुकूल वातावरण असताना पाहुण्यांचं हे जगावेगळं वागणं काही कळलं नाही.

Share Market : एक्झिट पोलच्या दाव्यांना परदेशी पाहुण्यांचा ठेंगा, लोकसभा निकालापूर्वीच शेअर बाजारातून इतके कोटी नेले मायदेशी
परदेशी पाहुण्यांचं हे वागणं बरं नव्हं
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 5:12 PM

वर्ष 2004 ते 2019 या कालावधीत लोकसभेच्या चार निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुका या मे महिन्यातच संपल्या. मे मध्येच निवडणुकीचे निकाल समोर आले. पण 2024 मधील निकाल थोडा वेगळा ठरला. निवडणुकीच्या इतिहासातील ही सर्वात दीर्घ निवडणूक ठरली आहे. संपूर्ण मे महिना संपून 1 जून रोजी सुद्धा सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान झाले. 4 जून रोजी लोकसभेचा निकाल हाती येतील. याच दरम्यान एक मोठी घटना घडली. गेल्या 20 वर्षांत असे काही घडले नव्हते. परदेशी पाहुण्यांचं असं वागणं बाजाराला काही रुचलं नाही.

परदेशी पाहुण्यांनी गुंडाळला गाशा

तर लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतारचे सत्र दिसले. मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांची जमापुंजी घेऊन गाशा गुंडाळला. यापूर्वी परदेशी पाहुण्यांनी 2004 मध्ये असा कारनामा केला होता. तेव्हापासून या 20 वर्षांत परदेशी गुंतवणूकदार असे विपरीत वागले नव्हते.

हे सुद्धा वाचा

परदेशी गुंतवणूकदारांनी थोडीफार नाही तर 25,500 कोटींहून अधिक रक्कम शेअर बाजारातून काढून घेतली आहे. हा आकडा लहान नाही. गेल्या 20 वर्षांतील आकडेवारी मागे वळून पाहता, असे पहिल्यांदाच घडले. एक्झिट पोल पाहता, बाजाराला पण परदेशी पाहुण्यांच्या या पलायनाचे कोडे अंचबित करणारे आहे.

मे महिन्यात ​25,500 कोटींहून काढले बाहेर

लोकसभेच्या निवडणूक निकालाच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीला परदेशी पाहुण्यांनी ठेंगा दाखवला. परदेशातील पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी, FPI ने मे महिन्यात बाजारात गुंतवलेले 25,500 कोटींहून काढून घेतले. यापूर्वी एप्रिल महिन्यात त्यांनी 8,700 कोटी रुपये काढले होते. त्यावेळी मॉरीशसचा वाद होता. इतर कारणं होती. पण मे महिन्यात काढलेली रक्कम भलीमोठी आहे.

दोन महिन्यात इतकी गुंतवणूक

डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, यापूर्वी परदेशी पाहुण्यांनी मार्च महिन्यात 35,098 कोटी रुपये, फेब्रुवारी महिन्यात 1,539 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर जानेवारी महिन्यात शेअर्समध्ये 25,743 कोटी रुपये काढले होते. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागेल. त्यानंतरच परदेशी पाहुणे त्यांचा गुंतवणुकीचा विचार पक्का करतील, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे.

20 वर्षांतील तोडला रेकॉर्ड

लोकसभेच्या निकालापूर्वी मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढली, तो आकडा या 20 वर्षांतील सर्वात जास्त आहे. 2004 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 3248 रुपये काढले होते. 2009 मध्ये परदेशी पाहुण्यांनी मे महिन्यात 20,116 कोटी रुपये ओतले होते. 2014 मध्ये पहिल्यांदा मोदी सरकार आले. त्यावेळच्या मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात 14,007 कोटी गुंतवले होते. तर वर्ष 2019 मधील मे महिन्यात गुंतवणुकीचा आकडा 7920 कोटींच्या घरात होता.

Non Stop LIVE Update
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्.
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले.
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर.
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा.
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?.