नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : तुम्हाला माहिती आहे का, शेअर बाजारातील बादशाह (The King of Indian Share Market) कोणाला म्हणता ते? भारतीय शेअर बाजारात असा एक स्टॉक आहे ज्याचे मार्केट कॅप शेअर बाजाराच्या मार्केट कॅप पेक्षा पण अधिक आहे. आपण जसा बँकांच्या बचत खात्यात पैसा ठेवतो, तसेच कंपन्यांचे शेअर डीमॅट खात्यात (Demat Account) ठेवतात. शेअर मार्केटचा हा स्टॉक डीमॅट खात्याची सुविधा देतो. या स्टॉकमध्ये इतकी क्षमता आहे की तो कधी बुडू शकत नाही. बाजाराती तज्ज्ञानुसार, हा शेअर जर बुडाला तर अवघ्या भारतीय शेअर बाजाराचे तारे गर्दीशमध्ये येतील. बाजाराला ओहोटी लागेल. कोणता आहे हा बाजारातील बाप शेअर?
शेअर बाजाराचा बादशाह
शेअर बाजारातील पैसा दोन कंपन्यांकडे जातो. पहिली कंपनी CDSL आहे. तर दुसरी कंपनी NDSL आहे. सेंट्रल डिपॉझटरी सर्व्हिसेज लिमिटेड हा तो स्टॉक आहे, जो गुंतवणूकदारांना बँकांसारखी सुविधा देते. ही कंपनी खरेदी केलेल्या शेअरला डीमॅट खात्यात जमा करण्याची सुविधा देते. CDSL चे मार्केट कॅप संपूर्ण बाजारच्या मार्केट कॅपहून पण जादा आहे. या स्टॉकमध्ये अजब वृद्धीची क्षमता आहे. शेअर मार्केटमध्ये लाखो डीमॅट खाते आहेत. त्याचे सीडीएसएलकडे 80 टक्के बाजारातील वाटा आहे. तर कंपन्याचे बाजारातील भांडवल 13,709 कोटी रुपये आहे.
सेंट्रल डिपॉझटरी सर्व्हिस लिमिटेड
सेंट्रल डिपॉझटरी सर्व्हिस लिमिटेड (CDSL) आणि नॅशनल सिक्योरिटीज डिपॉझटरी लिमिटेड (NSDL) या दोन्ही भारत सरकारच्या नोंदणीकृत शेअर डिपॉझटरी आहेत. शेअर, डिबेंचर, म्युच्युअल फंडला ही फर्म इलेक्ट्रॉनिक स्वरुपात जतन करते. प्रत्येक डिपॉझटरी एका स्टॉक एक्सचेंजशी जोडलेली आहे. सेंट्रल डिपॉझटरी सिक्युरिटज लिमिटेड, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील स्टॉक्स, ईटीएफ, बाँड्सची इलेक्ट्रॉनीक प्रत त्यांच्याजवळ ठेवते. NSE साठी हे काम नॅशनल सिक्योरिटीज डिपॉझटरी लिमिटेड (NSDL) हे काम करते.
एक शेअर कितीचा
सोमवारच्या व्यापारी सत्रात CDSL चा बंद भाव 1,312.90 रुपये होता. या दरम्यान तो 1,326 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला. नंतर त्यात 14 रुपयांची घसरण आली. हा शेअर 1,305 रुपयांच्या निच्चांकावर बंद झाला. भविष्यात या स्टॉकमध्ये गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरु शकते, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.