अरे ही ऑफर आहे की लॉटरी! 1 Share वर 100 रुपयांचा लाभांश देत आहे ही कंपनी

Share Market | अनेक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत लाभांश देणारा स्टॉक असतोच. आता या कंपनीने गुंतवणूकदारांना आनंदवार्ता दिली आहे. कंपनीने एका शेअरवर 100 रुपये लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. दिसा इंडिया लिमिटेड (Disa India Ltd) असे या कंपनीचे नाव आहे. जितके जास्त शेअर तेवढा अधिक फायदा होणार आहे.

अरे ही ऑफर आहे की लॉटरी! 1 Share वर 100 रुपयांचा लाभांश देत आहे ही कंपनी
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 2:54 PM

नवी दिल्ली | 16 February 2024 : शेअर बाजारात अनेक जण त्यांचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवतात. त्यांच्याकडे अनेक क्षेत्रातील कंपन्यांचे स्टॉक असतात. काही जणांच्या पोर्टफोलिओत डिव्हिडंड वाटणाऱ्या कंपन्यांचे शेअर आवार्जून असतात. या कंपनीने गुंतवणूकदारांना अशीच खुशखबर दिली आहे. दिसा इंडिया लिमिटेड (Disa India Ltd) ही कंपनी शेअरधारकांना डिव्हिडंडची भेट देणार आहे. ही कंपनी एक शेअरवर 100 रुपयांचा लाभांश वाटणार आहे. ही कंपनी आजच, 16 फेब्रुवारी रोजी एक्स -डिव्हिडेंड स्टॉक म्हणून व्यापार करेल. जाणून घ्या या शेअरविषयी…

कधी देणार लाभांश

कंपनीने शेअर बाजाराला डिव्हिडंडविषयी महिती दिली आहे. त्यानुसार, 10 रुपये फेसव्हॅल्यू असणाऱ्या एका शेअरवर 100 रुपये लाभांश देण्यात येणार आहे. म्हणजे एका गुंतवणूकदारांना एका शेअरवर 1000 टक्क्यांचा लाभांश मिळेल. कंपनीने या डिव्हिडंडसाठी 16 फेब्रुवारी ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून घोषीत केली आहे. दिसा इंडिया लिमिटेड 6 मार्च अथवा त्यापूर्वी लाभांशची रक्कम पात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करणार आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी दिला होता लाभांश

Disa India Ltd पहिल्यांदा 2024 मध्ये एक्स डिव्हिडेंड ट्रेड करत आहे. कंपनी 2023 मध्ये 1 शेअरवर 110 रुपयांचा लाभांश दिला होता. कंपनी 2008 पासून सातत्याने गुंतवणूकदारांना डिव्हिडंडची भेट देत आहे. पहिल्यांदा कंपनीने 2001 मध्ये लाभांश दिला होता. तेव्हा पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 2.4 रुपयांचा फायदा झाला होता.

शेअरची किंमत तरी काय

Disa India Ltd कंपनीचा शेअर बीएसईवर गुरुवारी 15,175.05 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या 6 महिन्यात या शेअरच्या किंमतीत केवळ 1.13 टक्क्यांची तेजी दिसून आली. एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 91 टक्क्यांहून अधिकचा लाभ दिला आहे. बीएसईमध्ये कंपनीचा 52 आठवड्यातील उच्चांक 17,570 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 7600 रुपये प्रति शेअर होता. कंपनीचे मार्केट कॅप 2206.76 कोटी रुपये आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.