Share Market | मोदी की गॅरंटी! आज मालामाल झाले हे गुंतवणूकदार

Share Market | एकीकडे सरकार खासगीकरणाच्या मागे लागले आहे. अनेक सरकारी कंपन्या, बँकांमध्ये निर्गुंतवणुकीचा अजेंडा सुरु असताना काही सरकारी कंपन्यांनी मात्र जोरदार कामगिरी बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 महिन्यांपूर्वी दाखवलेले स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे.

Share Market | मोदी की गॅरंटी! आज मालामाल झाले हे गुंतवणूकदार
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 2:14 PM

नवी दिल्ली | 7 February 2024 : 10 ऑगस्ट 2023 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जवळपास 2 तास 13 मिनिटांचे दीर्घ भाषण केले होते. हे भाषण त्यावेळी फार गाजले होते. कारण मोदी सरकार हे खासगीकरणाला प्राधान्य देत आहे. अनेक सरकारी कंपन्या विक्रीला काढण्यात येणार आहे. सरकार निर्गुंतवणुकीवर भर देत आहे, अशी राळ विरोधकांनी उठवली होती आणि त्यात तथ्य पण होते. सरकार निर्गुंतवणुकीचे धोरण राबवत आहे. पण पंतप्रधानांनी केलेल्या दीर्घ भाषणात सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. जणू ती मोदींची गॅरंटीच होती. मोदींच्या या गॅरंटीवर सरकारी कंपन्या खऱ्या उतरल्या. त्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले.

शेअर्सचा जबरदस्त रिटर्न

गेल्या 6 महिन्यातील आकड्यांवर नजर टाकता, सरकारी शेअर्संनी जबरदस्त तेजी नोंदवली आहे. कधी काळी या सरकारी कंपन्यांकडे गुंतवणूकदार ढुंकूनही पाहत नव्हते. ते शेअर आज सर्वात पुढे आहेत. ज्या सरकारी कंपन्या बंद होतील, असा लोकांचा दावा आहे. ते शेअर खरेदी करा. त्यात गुंतवणूक करा. तुम्ही मालामाल व्हाल, असा विश्वास मोदींनी दिला होता. पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर हल्ला करताना हा सल्ला दिला होता. त्यावेळी ज्यांनी विश्वास ठेवला ते खरंच आज मालामाल झाले.

हे सुद्धा वाचा

LIC आणि HAL ची कमाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दीर्घ भाषणात सरकारी कंपन्यांची नावे पण घेतली. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी आणि एचएएल यांचा समावेश होता. गेल्या सहा महिन्यातील या दोन सरकारी कंपन्यांच्या शेअरवर नजर टाकली तर बदल लक्षात येईल. एलआयसीचा शेअर गेल्या 6 महिन्यांपूर्वी केवळ 655 रुपयांवर होता. तो आता 1029 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या सहा महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 57 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

HAL ने केले मालामाल

दुसरी कंपनी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने पण गुंतवणूकादारांना मालामाल केले. गेल्या सहा महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 56.37 टक्के जोरदार रिटर्न दिला आहे. 6 महिन्यापूर्वी या सरकारी कंपनीच्या शेअरची किंमत 1876 रुपयांच्या जवळपास होती. आता हा शेअर 2933 रुपयांच्या घरात पोहचला आहे. या सहा महिन्यात गुंतवणूकदारांना 1000 रुपयांपेक्षा अधिकचा फायदा मिळाला आहे.

56 कंपन्या आणि 23.7 लाख कोटींची कमाई

एलआयसी आणि एचएएल या कंपन्यांव्यतिरिक्त एक दोन नाही तर एकूण 56 सरकारी कंपन्यांनी 6 महिन्यांत 66 टक्क्यांची उसळी घेतली आहे. या दरम्यान या सरकारी कंपन्यांनी गुंतवणूकदारांना 23.7 लाख कोटींची कमाई केली आहे. एनबीसीसी सारख्या शेअरने पण गुंतवणूकदारांना मालामाल केले. या शेअरने सहा महिन्यात 232 टक्क्यांचा परतावा दिला. 6 महिन्यांपूर्वी हा शेअर 48 रुपयांवर होता.आता त्याची किंमत 160 रुपयांवर पोहचली आहे. तर रेल्वे विकास निगम, एमएमटीसी, एनडीएमसी, सेंट्रल बँक, युको बँक, इरकॉन, एनएचपीसीसह 56 कंपन्यांनी मैदान गाजवले आहे.

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.