Share Market : 1 शेअरवर मिळणार 2 बोनस शेअर, गुंतवणुकीदारांची होळीपूर्वीच चांदी!

Share Market : बुधवारी या कंपनीच्या एका शेअरचा भाव 740 रुपये होता. त्यामध्ये 1.99 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर किंमतीत 740 टक्क्यांचा फायदा मिळाला.

Share Market : 1 शेअरवर मिळणार 2 बोनस शेअर, गुंतवणुकीदारांची होळीपूर्वीच चांदी!
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 11:13 AM

नवी दिल्ली : स्टॉक मार्केटमध्ये बोनस शेअर (Bonus Share) कोणाला नको? अनेक गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीवर विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी ही गुंतवणूक फायदेशीर ठरते. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार उत्सुक असतात. अशा गुंतवणूकदारांसाठी होळीपूर्वी गुंतवणुकीची मोठी संधी आहे. शेअर बाजारात कॅप्टन पाईप्स लिमिटेड (Captains Pipes Limited) गुंतवणूकदारांना 1 शेअरवर मिळणार 2 बोनस शेअर देणार आहे. पीव्हीसी पाईप्स तयार करणारी कंपनी शेअरमध्ये वाटा ही मिळणार आहे. बुधवारी या कंपनीच्या एका शेअरचा भाव 740 रुपये होता. त्यामध्ये 1.99 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर किंमतीत 740 टक्क्यांचा फायदा मिळाला

कॅप्टन पाईप्स लिमिटेडने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, 23 फेब्रुवारी रोजी याविषयीचा निर्णय घेण्यात आला. त्यात शेअरचा वाटा आणि बोनस शेअर देण्यावर कार्यकारी मंडळाने शिक्कामोर्तब केले. मंडळाने 1 शेअरचे 10 वाटे करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर मिळणार 2 बोनस शेअर देण्यात येणार आहे. या बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटसाठी 3 मार्च 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.

बुधवारी या कंपनीच्या एका शेअरचा भाव 740 रुपये होता. त्यामध्ये 1.99 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर किंमतीत 740 टक्क्यांचा फायदा मिळाला. गेल्या 6 महिन्यात ज्या गुंतवणूकदारांना त्याचे शेअर विक्री केले नाही. त्यांना या कंपनीने मोठा फायदा मिळवून दिला आहे. स्टॉक होल्ड करणाऱ्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा मिळाला आहे. या स्मॉल कॅप कंपनीचा 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 790 रुपये आहे तर 52 आठवड्यातील नीच्चांक 72 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

महारत्न कंपनी गेल इंडियाने (Gail India Share) कमाल केली. हा शेअर मल्टिबॅगर ठरला. या शेअरने गुंतवणूकदारांना  जोरदार परतावा दिला. या सरकारी कंपनीने शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं. या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावून ज्यांनी संयम ठेवला, ते गुंतवणूकदार एकदम मालामाल झाले. गेल इंडियामध्ये शेअरधारकांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक करुन सोडून दिली असती, तर ते आज कोट्यधीश असते. या एक लाख रुपयांचे आता 1.88 कोटी रुपये झाले असते. गुंतवणूकदारांना कंपनीने तगडा रिटर्न मिळवून दिला. बोनस शेअरमुळे गुंतवणूकदारांना हा फायदा झाला. गेल इंडियाने 2008 पासून आतापर्यंत शेअर होल्डर्सला 5 वेळा बोनस शेअर दिला आहे.

युको बँकेचा शेअरने पण (UCO Bank Share) गेल्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांना 116% पेक्षा अधिकचा परतावा दिला आहे. हा शेअर बीएसईवर सहा महिन्यांपूर्वी 11 रुपये होता. आता या शेअरची किंमत 25.30 रुपये झाली आहे. डिसेंबरच्या तिमाहीत या शेअरने जवळपास 653 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.