Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sensex : भारतीय शेअर बाजाराने इतिहास रचला, पहिल्यांदाच सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा गाठला!

भारतीय शेअर बाजाराची आज धडाकेबाज सुरुवात झाली. सेन्सेक्सने (BSE Sensex) शुक्रवारी सकाळी तब्बल 60 हजारांचा टप्पा गाठत इतिहास रचला. सकाळच्या सत्रात निर्देशांकात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

Sensex : भारतीय शेअर बाजाराने इतिहास रचला, पहिल्यांदाच सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा गाठला!
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 10:54 AM

मुंबई : भारतीय शेअर बाजाराची आज धडाकेबाज सुरुवात झाली. सेन्सेक्सने (BSE Sensex) शुक्रवारी सकाळी तब्बल 60 हजारांचा टप्पा गाठत इतिहास रचला. सकाळच्या सत्रात निर्देशांकात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. सेन्सेक्सने जोरदार सलामी दिल्याने गुंतवणूकदारांमध्ये चैतन्य पाहायला मिळालं. सेन्सेक्समध्ये 273 अंकांची वाढ होऊन तो 60,158.76 अंकांवर उघडला. थोड्याच वेळात निर्देशांकाने 60,333 पर्यंत मजल मारत, नवी उंची गाठली.

दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही (NSE Nifty) 75 अंकांची वाढ पाहायला मिळाली. निफ्टीची सुरुवात 17,897.45 अंकावर होऊन 17,947.65 पर्यंत मजल मारली. निफ्टीचाही हा आजपर्यंतचा उच्चांक आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातूनं सकारात्मक संकेत

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही, यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये गुरुवारी सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. अमेरिकन सरकार तिथे अद्याप मदत पॅकेज मागे घेण्याची पावले उचलणार नाही. तिकडे चीनच्या मध्यवर्ती बँकेने बँकिंग व्यवस्थेत रोख रक्कम गुंतवून Evergrande मुद्द्यावर थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Evergrande ही चिनी रिअल इस्टेट कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या शेअर बाजारांवर झाला आहे. Evergrande सुमारे 22.45 लाख कोटी रुपये कर्ज आहे. यामुळे चीनमध्ये अमेरिकेतील सब प्राईम आणि लीमन ब्रदर्ससारखं संकट निर्माण होऊ नये.

संबंधित बातम्या 

Stock Market: बाजाराची जोरदार सुरुवात, सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांना 2 लाख कोटींचा फायदा

Share Market Update : Sensex touches 60,000 for first time BSE Stock Markets