Share Market Updates: पहिल्याच दिवशी शेअर बाजाराचा स्वींग मूड ! 600 अंकांनी बाजार घसरला

| Updated on: May 02, 2022 | 10:14 AM

शेअरबाजारावर यावेळी अनेक घटकांचा दबाव वाढला आहे. LIC IPO पूर्वीच विक्रीचा दणका सुरु आहे. अनेकांना या आयपीओत मध्ये नशीब आजमावयाचे आहे. याव्यतिरिक्त अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेकडेही बाजाराचे लक्ष्य लागले आहे.

Share Market Updates: पहिल्याच दिवशी शेअर बाजाराचा स्वींग मूड ! 600 अंकांनी बाजार घसरला
घसरणीचे सलग 6 दिवस, शेअर बाजार गडगडला
Image Credit source: TV9
Follow us on

उन्हामुळे लाही लाही होणा-या आणि घामाच्या धारा काढणा-या मे महिन्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात (Share Market) ही वातारवण तापलेले आहे. महिन्याच्या पहिल्याच सोमवारी बाजारावर अनेक घटकांचा प्रभाव दिसत आहे. त्यामुळे बाजार पहिल्याच दिवशी 600 अंकांनी घसरला आहे. आज सकाळी सेन्सेक्स (Sensex) 631 अंकांनी (1.11 टक्के) घसरत 56429 अंकांवर तर निफ्टी 178 अंकांच्या (1.04 टक्के) घसरणीसह 16924 अंकावर तर निफ्टी बँक 1.28 टक्के घसरणीसह उघडला. उद्या शेअर बाजार बंद राहणार आहे. 4 मे रोजी भारतीय आर्युविमा महामंडळाचा आयपीओ बाजारात दाखल होत आहे. शुक्रवारी अंतिम सत्रात बाजारावर प्रचंड दबाव दिसून आला. बाजारातील विश्लेषकांच्या मते, गुंतवणुकदारांनी एलआयसी आयपीओत (LIC IPO) गुंतवणूक करता यावी यासाठी मोठ्या प्रमाणात विक्रीचा दणका सुरु केला आहे. अमेरिकन शेअर बाजारात ही मोठ्या प्रमाणात विक्री नोंदवण्यात आली. नॅसडॅक मध्ये 4.17 टक्के तर एसपी 500 मध्ये 3.63 टक्क्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात बाजारात घसरण दिसून आली. त्यामुळे बाजाराने नकारात्मक दिशेने प्रवास केल्याचे समोर आले.

ऑटो क्षेत्रात तेजी

आज HDFC आणि ब्रिटानिया कंपनींचा कारभाराचा लेखाजोखा समोर येणार आहे.वाहन ७ेत्रातील कंपन्यांनी एप्रिल महिन्यातं जोरदार प्रदर्शन केले आहे. अशोक लेलँडच्या विक्रीत 42 टक्के वृद्धी झाली आहे. तर मारुतीच्या विक्रीत किंचित घसरण दिसून आली. टाटा मोटर्सच्या विक्रीत 74 टक्क्यांची वाढ झाली आहे.

हे स्टॉक्स करतील मालामाल

नोमुराने इंडसइंड बँकेत खरेदीचा सल्ला दिला आहे. या बँकेच्या शेअरमध्ये 1285 रुपयांचे टार्गेट आहे. सीएसने एचडीएफसीच्या शेअरमध्ये मत नोंदवत याचे टार्गेट 43 रुपये ठेवले आहे. जेफरीजने विप्रोतील टार्गेट 545 रुपये मॉर्गन स्टेनलीने टार्गेट 640 रुपये ठेवले आहे.

फेडरलच्या भूमिकेकडे लक्ष

गुंतवणुकदारांचे लक्ष अमेरिकन फेडरल बँकेच्या ( US federal ) भूमिकेकडे लागले आहे. एफओएमसी ची बैठक बुधवारी होणार आहे. त्यातील निर्णयावर भारतीय बाजारात नक्कीच प्रतिक्रिया उमटतील. फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात 50-75 बेसिस पॉईटची वाढ करण्याची शक्यता आहे. अमेरिकन फेडरल बँकेसह बँक ऑफ इंग्लंड ही व्याजदराबाबत धोरण स्पष्ट करेल. यासोबतच अमेरिकेतील रोजगारसंबंधीची माहिती ही याच आठवड्यात जगासमोर येणार आहे.

काही काळापर्यंत बाजारावर दबाव

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसचे संशोधक विभागाचे प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, एलआयसीचा आयपीओ 4 मे रोजी बाजारात दाखल होत आहे. यामुळे बाजारात विक्री तेजीत राहिल आणि काही काळ बाजारावर दबाव काय राहिल.