शेअर बाजारात 900 अंकांची वाढ, गुंतवणूकदारांच्या जिवात जीव! पण रुपयांचं मूल्य आणखी घसरल्यानं चिंता

Share Market Update today : आरबीआयनं एचडीएफसी बँकेच्या डिजिटल 2.0 प्रोग्रामवर लावलेले निर्बंध काढलेत. त्यामुळे एचडीएफसीचा शेअरही सोमवारी तेजीत असल्याचं पाहायला मिळालं.

शेअर बाजारात 900 अंकांची वाढ, गुंतवणूकदारांच्या जिवात जीव! पण रुपयांचं मूल्य आणखी घसरल्यानं चिंता
शेजर बाजारात आज नेमकं काय घडलं?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 6:32 PM

मुंबई : युक्रेन आणि रशियामधील युद्धाचे परिणाम शेअर बाजारावर (Share Market) जाणवले होते. आता या युद्धानंतर पुन्हा एकदा शेअर बाजार उभारी घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं सोमवारी समोर आलेल्या आकडेवारीतून दिसून आलं आहे. मागच्या आठवड्यात शेअर बाजारनं सावरण्याचा प्रयत्न केला होता. तो सिलसिला या आठवड्याच्या सुरुवातीलाही पाहायला मिळालाय. सोमवारी शेअर बाजार 935 अंकांच्या वाढीसह स्थिरावला. 56 हजार 486 अंकावर सेन्सेक्स (Sensex) पोहोचलाय. तर निफ्टीमध्ये 241 अंकाची वाढ पाहायला मिळाली आहे. निफ्टी 241 अंकांनी वाढून 16 हजार 871 वर पोहोचलाय. सोमवारी इन्फफोसिस, स्टे बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि एक्सिस बँकेचा शेअर तीन टक्क्यांनी वाढलाय. तर हिंदुस्थान युनिलीव्हर, सनफार्मा, डॉ. रेड्डी आणि टाटा स्टीलच्या शेअरमध्ये पडझड पाहायला मिळाली. दरम्यान, मार्केट कॅपही सोमवारी वाढलंय. मार्केट कॅप (Market Cap) वाढून आता 254.34 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. सोमवारी गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. यामुळे गुंतवणूकदारांना जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

हिंदुस्थान युनिलिव्हरनं आपल्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ केली आहे. याचा परिणाम थेट त्यांच्या शेअर्सवर दिसून आला आहे. तर पेटीएमचा शेअरही पडला असून त्यात 12.21 टक्के इतकी घट झाली आहे. सध्या पेटीएमचा शेअर 680 रुपये इतक्या कमी किंमतीवर बंद झालाय.

HDFC तेजीत!

आरबीआयनं एचडीएफसी बँकेच्या डिजिटल 2.0 प्रोग्रामवर लावलेले निर्बंध काढलेत. त्यामुळे एचडीएफसीचा शेअरही सोमवारी तेजीत असल्याचं पाहायला मिळालं. गुंतवणूकदारांमध्ये एचडीएफसीच्या शेअरबाबत सकारात्मक प्रतिसाद दिसून आला आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोन्ही शेअरमध्ये वाढ दिसून आली आहे. दोन्ही कंपन्यांचा बाजारातील दबदबा त्यामुळे वाढला आहे. अनेक तज्ज्ञांनीही एचडीएफच्या शेअरला येत्या काळात अधिक चांगले दिवस येतील, अशी शक्यता वर्तवली आहे.

रुपयाची घसरण!

दरम्यान, डॉलच्या तुलनेत शेअर बाजारात पुन्हा एकदा रुपयाचं मूल्य घसरलं आहे. 11 पैशांची घसरणं एका डॉलरच्या तुलनेत झाली आहे. 11 पैशांची घट होत आता डॉलरची किंमत 76.55 इतकी झाली आहे. फेब्रुवारी महागाईचा दर 13.11 टक्क्यावर पोहोचला असून जानेवारीच्या तुलनेत हा दर आणखी वाढला आहे. जानेवारीचत महागाईचा दर 12.96 टक्के इतका होता. महागाई वाढत असल्याकारणानं रुपयाचं मूल्य आणखी घसरत असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय.

संबंधित बातम्या :

महागाईचा भडका! हिंदुस्थान युनिलिव्हरचा ग्राहकांना धक्का; चहा, कॉफीच्या भावात 14 टक्क्यांची वाढ

कच्च्या तेलाच्या वाढत्या भावाचा प्रवाशांना फटका; विमान प्रवास महागला, तिकिटांच्या दरामध्ये 15 ते 30 टक्क्यांची वाढ

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताय? वेळीच समजून घ्या धोके, अन्यथा गुंतवलेला पैसा ठरेल डोकेदुखी!

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.