Share Market Updates : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात किंचित तेजी, गुंतवणूकदारांना दिलासा
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात (Stock market) तेजी दिसून येत आहे. आज पहिल्याच सत्रामध्ये सेंसेक्समध्ये (Sensex) 215 अंकाची तेजी दिसून आली. सेंसेक्स 215 अंकाच्या वाढीसह 57381 अंकांवर पोहोचला. तर निफ्टी देखील 85 अकांनी वधारला.
नवी दिल्ली : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात (Stock market) तेजी दिसून येत आहे. आज पहिल्याच सत्रामध्ये सेंसेक्समध्ये (Sensex) 215 अंकाची तेजी दिसून आली. सेंसेक्स 215 अंकाच्या वाढीसह 57381 अंकांवर पोहोचला. तर निफ्टी देखील 85 अकांनी वधारला. सध्या निफ्टी 17258 अकांवर पोहोचला आहे. सोमवारी शेअर बाजारामध्ये मोठी उलथापालथ पहायला मिळाली होती. शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली. शेअर बाजार तब्बल 1200 अंकाच्या घसरणीसह बंद झाला होता. सोमवारी गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला होता. त्यातुलनेने आजचे चित्र काहीसे अशादायी आहे. शेअर बाजार ओपन होताच पहिल्याच सत्रामध्ये सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे 215 आणि 85 अंकाची वाढ पहायला मिळाली. आज शेअर बाजारात किंचित तेजी दिसत असल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. गेल्या पाच एप्रिलपासून शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. याचा सर्वाधिक फटका हा एचडीएफसी (HDFC), एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांना बसला आहे.
कोणत्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी?
आज शेअर बाजार सुरू होताच पहिल्या सत्रात तेजी दिसून आली. मात्र सध्या शेअरबाजारामध्ये विक्रेते आणि खरेदीदार यांच्यामध्ये एक विचित्र स्पर्धा पहायला मिळत आहे. त्याचा मोठा फटका हा शेअर मार्केटला बसताना दिसून येत आहे. शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव वाढल्याने मंदीचे वातावरण आहे. सध्या स्थितीमध्ये बजाज फयनान्स सर्व्हिसेस, मारुती, एसबीआय आणि अल्ट्राटेक सीमेंट यांच्या शेअरमध्ये तेजी आहे, तर दुसरीकडे एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस सारख्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव घसरले आहेत. सोमवारी शेअर्स घसरल्याने इन्फोसिसला कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे.
जागतिक बाजाराची स्थिती
जागतिक बाजाराबाबत बोलायचे झाल्यास सोमवारी अमेरिकन शेअर बाजात मोठी पडझड पहायला मिळाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह पुन्हा एकदा इंट्रेस्ट रेट वाढवण्याच्या विचारात आहे. फेडरल रिझर्व्हचा कल पहाता अमेरिकन शेअर मार्केटवर देखील विक्रीचा दबाव वाढला आहे. दुसरीकडे सोमवारी आशियाई शेअर मार्केटमधील देखील अनेक शेअर मार्केट कोसळले आहेत. वाढत असलेली महागाई तसेच कच्च्या तेताच्या किमतीमध्ये सुरू असलेला चढ उताराचा मोठा परिणाम हा शेअर बाजारावर होत असल्याचे पहायला मिळत आहे.