इकडे शेअर विका; लगेच खात्यात पैसा, T+0 सेटलमेंटला मंजूरी

Share T+0 Settlement | आतापर्यंत शेअर बाजारात T+1 सेटलमेंट सायकल लागू आहे. म्हणजे शेअर खरेदी-विक्रीच्या सेटलमेंटसाठी एक दिवस लागतो. त्यापूर्वी तीन ते चार दिवस लागत होते. हा कालावधी गेल्यावर्षी कमी झाला. तर आता शेअरची खरेदी-विक्रीची सेटलमेंट लागलीच होईल.

इकडे शेअर विका; लगेच खात्यात पैसा, T+0 सेटलमेंटला मंजूरी
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 2:50 PM

नवी दिल्ली | 16 March 2024 : शेअर बाजारात स्टॉक खरेदी-विक्रीची सेटलमेंट लागलीच होणार आहे. सध्या T+1 सेटलमेंट सायकल लागू आहे. म्हणजे शेअर खरेदी-विक्री सेटलमेंटसाठी एक दिवस लागतो. तो आता इतिहासजमा होईल. T+0 सेटलमेंटला सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) मंजूरी दिली आहे. शुक्रवारी सेबी बोर्डाने हा निर्णय घेतला. त्यामुळे शेअर विकला की लागलीच तुमच्या खात्यात रक्कम (T+0 Settlement) जमा होणार आहे. या महिन्यातच हा निर्णय लागू होत आहे. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा होईल.

चीनच्या बरोबरीने भारत

सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, शेअरच्या खरेदी-विक्रीचा झटपट व्यवहार होईल. ही व्यवस्था मार्च 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. सध्या देशात भारतीय शेअर बाजारात T+1 व्यवस्था लागू आहे. जगातील अनेक देशात सध्या T+2 अशी व्यवस्था आहे. T+0 ही व्यवस्था लागू झाल्यामुळे भारत हा चीननंतर अशी व्यवस्था देणारा जगातील दुसरा देश ठरला आहे. या 28 मार्चपासून कॅश सेगमेंटमध्ये खात्यात झटपट पैसा जमा होईल.

हे सुद्धा वाचा

एआयची मदत

सेबीचे म्युच्युअल फंडावर बारकाईने नजर ठेवत आहे. त्यासाठी जवळपास 80 एल्गोरिदमचा वापर करण्यात येत आहे. फंड हाऊसने गडबडी केल्यास त्यासंबंधीचा अहवाल लागलीच तयार करण्यात येत आहे. आता AI ची मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व्यवहार होत असेल तर ते समोर येणार आहे.

असा होईल बदल

  • मार्केट नियंत्रक सेबीने याविषयीची माहिती यापूर्वीच दिली आहे. त्यानुसार, T+0 लागू केल्यास सेटलमेंट करताना लिक्विडीटीची अडचण येणार नाही. गुंतवणूकदाराकडे T+1 ऐवजी T+0 आणि झटपट सेटलमेंटचा पर्याय असेल. T+0 दुपारी 1:30 वाजेपर्यंत व्यापारासाठी मदत करेल. यामध्ये शेअरचा पैसा संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.
  • दुसऱ्या टप्प्यात गुंतवणूकदारांना 3:30 वाजेपर्यंतच्या सर्व व्यवहारासाठी पर्यायी झटपट सेटलमेंटचा पर्याय मिळेल. ट्रेडर्स, गुंतवणूकदार अशा पर्यायाद्वारे सहज ट्रेडिंग करतील. त्यामुळे खात्यात रक्कम जमा होण्यासाठी त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.