नवी दिल्ली : आरएसीएल गियरटेक (RACL Geartech Ltd) या शेअरने दीर्घकालावधीत गुंतवणूकदारांना कमाल परतावा दिला आहे. हा शेअर मल्टिबॅगर (Multibagger Stock) ठरला. त्याने दीर्घकालीनच नाही तर शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनाही मालामाल केले आहे. या शेअरने शुक्रवारी 3 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसईवर 1.66 टक्के तेजी नोंदवली. हा शेअर 765.75 रुपयांवर बंद झाला. गेल्या दोन वर्षांत या शेअरने कमाल केली. दोन वर्षांनंतर गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 14 पट परतावा दिला आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरले आहे.
आरएसीएल गियरटेकच्या शेअरने गुंतवणूकदारांना गेल्या आठवड्यात जवळपास 6.21 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या शेअरने गेल्या महिन्यात 2 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचा पैसा कित्येक पटीने वाढविला आहे.
गेल्या सहा महिन्यात जवळपास 37 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. जर एका वर्षाचा विचार केला असता, या शेअरने जवळपास 23 टक्क्यांची भरारी घेतली आहे. एवढेच नाही तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा दिला आहे. या शेअरमध्ये पाच वर्षांपूर्वी गुंतवणूक करणाऱ्यांना तर जॅकपॉट लागला आहे. या गुंतवणूकदारांना जवळपास 1070 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.
आरएसीएल गियरटेक शेअरमध्ये जास्त काळ विश्वास ठेवणाऱ्यांना मोठा परतावा मिळाला आहे. या शेअरने गेल्या 2 वर्षांतील शेअरधारकांना मालामाला केले आहे. या गुंतवणूकदारांची रक्कम 14 पटीत वाढली आहे. बाजारात कितीही चढउतार आले तरी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळाला आहे.
या कंपनीच्या एका शेअरची किंमत एप्रिल 2020 मध्ये 53.80 रुपये होती. आज या शेअरची किंमत 765.75 रुपयांवर पोहचली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये एप्रिल 2020 मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत जवळपास 14 लाख रुपये झाली असती.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कंपनी करते तरी काय? तर आरएसीएल गियरटेक लिमिटेड ही भारताची महत्वाची कंपनी आहे. ही कंपनी तीन चाकी, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी ऑटोमोटिव्ह गिअर आणि कंपोनेंट्स तयार करते. ही कंपनी महत्वाचा भाग तयार करते.
या कंपनीचा यादीत मोठ्या कंपन्या आहेत. आलिशान वाहनं तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांना आरएसीएल गियरटेक लिमिटेड ऑटोमोटिव्ह गिअर आणि कंपोनेंट्स पुरविते. यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह होंडा, केटीएम आणि पियागियो या स्थानिक उत्पादकांचाही समावेश आहे. दुचाकी कंपन्यांना ही कंपनी ऑटोमोटिव कंपोनेंट्स पुरविते.
हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या. गडबडीत अथवा घाईघाईत कोणताही निर्णय घेणे आर्थिक नुकसान करणारे ठरू शकते.