मोदी सरकारचा निर्णय पथ्यावर पडला; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार एका महिन्यात मालामाल

तुम्हाला कोणत्याही बँकेती एफडी किंवा आरडीमध्ये इतका परतावा मिळणार नाही, तितका फायदा या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना झाला आहे. (Shares Of  Easy Trip Planners Travel Company)

मोदी सरकारचा निर्णय पथ्यावर पडला; 'या' कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार एका महिन्यात मालामाल
money
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 12:12 PM

मुंबई : शेअर बाजार म्हटलं की सट्टा, जुगार, लाखाचे बारा हजार करण्याचा उद्योग असं सहज म्हटलं जातं. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे मानले जाते. या ठिकाणी परताव्याची कोणतीही शाश्वती नसते. मात्र तरीही काही कंपन्यांना आठवडा किंवा महिनाभरात गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न देतात. नुकतंच ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी ईझी ट्रीप प्लॅनर्स (Easy Trip Planners) शेअरमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार महिनाभरात मालामाल झाले आहेत. (Shares Of  Easy Trip Planners Travel Company Are Up More Than 100 Percent In A Month)

विशेष म्हणजे एका महिन्यात या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहे. तुम्हाला कोणत्याही बँकेती एफडी किंवा आरडीमध्ये इतका परतावा मिळणार नाही, तितका फायदा या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना झाला आहे.

ईजी ट्रीप प्लॅनर्सच्या शेअरची किंमत 52 आठवड्यांनंतर 11 जून 2021 रोजी उच्चांकी 454.35 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना लॉकडाऊननंतर प्रवासी निर्बंध हटवण्यात आले आहे. तसेच अनेक नियमात शिथिलता दिली आहे. त्यामुळे देशातील प्रवासी आणि पर्यटन क्षेत्रात मागणी वाढली आहे. त्यामुळे या शेअरच्या किंमतीत आतापर्यंत यात 5.4 टक्क्याने वाढ झाली आहे.

शेअर्समध्ये 200 टक्क्यांनी वाढ

हा शेअर 19 एप्रिलला 52 आठवड्यांच्या निच्चांकावर 147.50 रुपयांपर्यंत पोहोचला होता. पण त्यानंतर त्यात 208 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ईजी ट्रीप प्लॅनर्सने 19 मार्चला शेअर बाजारात प्रवेश केली होती. यानंतर या कंपनीची लिस्टिंग चांगल्या रितीने झाली आहे.

या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून 510 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यावेळी याची issue price ही प्रति शेअर 187 रुपये निश्चित करण्यात आली होती.

कंपनी व्यवसाय

ईजी माय ट्रिप दिल्ली-आधारित ऑनलाईन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म कंपनी आहे. याद्वारे तुम्ही फ्लाईट, ट्रेन, बसची तिकीट बुक करु शकता. ही कंपनी Android, iOS आणि वेबसाईटद्वारे सेवा देते.

देशातील दुसरी सर्वात मोठी ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी Easy Trip Planners सलग तीन वर्षांपासून नफ्यात आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा वाढून 35 कोटी रुपये इतका झाला. तर आर्थिक वर्ष 2018 मध्ये कंपनीचा नफा हा 7 कोटी रुपये होता.

(Shares Of  Easy Trip Planners Travel Company Are Up More Than 100 Percent In A Month)

संबंधित बातम्या : 

PPF Vs Sukanya Samriddhi Scheme | मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची चिंता, कोणती योजना उत्तम, कुठे सर्वाधिक फायदा, जाणून घ्या सर्व माहिती

Business Ideas For Villages : कमी गुंतवणूकीत मोठा नफा, गावासह शहरातही सुरु करता येतील ‘हे’ पाच व्यवसाय

कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसणार, केंद्र सरकार अनेक भत्ते कापणार

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.