हा तर आधुनिक कर्ण, आतापर्यंत 80 कोटींचे शेअर केले दान

या खासगी बँकेच्या सीईओने त्याचे सहकारी, हितचिंतकांना मालामाल केले आहे. कधीकाळी ज्यांनी हजार रुपयांची वा त्यापेक्षा कमी का असेना पण खारीचा वाटा दिला. त्या सर्वांना या सीईओने आज मदत केली. त्याने या सर्वांना शेअर गिफ्ट केले. त्यामुळे या सर्वांना मोठा फायदा झाला.

हा तर आधुनिक कर्ण, आतापर्यंत 80 कोटींचे शेअर केले दान
कोट्यवधींचे शेअर केले दान, हा आधुनिक कर्ण तरी कोणImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 10:08 AM

IDFC First Bank चे सीईओ व्ही वैद्यनाथन हे जणू आधुनिक कर्णच आहेत. त्यांनी मित्र, सहकारी, हितचिंतकांना आतापर्यंत मोठं मोठे गिफ्ट दिले आहे. ते कायम चर्चेत असतात. आता पण त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना शेअर गिफ्ट दिले आहे. या शेअरची किंमत कोट्यवधी रुपये आहे. कधीकाळी या सहकाऱ्यांनी, मित्रांनी, हितचिंतकांनी त्यांना मोठी मदत केली. अगदी हजार रुपये वा त्यापेक्षा कमी खारीचा वाटा उचलणाऱ्यांना पण ते कधी विसरले नाहीत. त्यांनी या ऋणातून उतराई होण्याचाच प्रयत्न केला नाही तर, या सर्वांना मालामाल केले.

आतापर्यंत कोट्यधींचे गिफ्ट

आयडीएफसी फर्स्ट बँकेचे सीईओ आणि एमडी व्ही. वैद्यनाथन यांनी यावेळी 5 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेल्या शेअरचे वाटप केले आहे. त्यांनी जुने सहकारी, हितचिंतकांना आयडीएफसी फर्स्ट बँकेचे 7 लाख शेअर दिले आहेत. या सर्वांचे बाजारातील मूल्य साडे पाच कोटींहून अधिक आहे. गिफ्ट देण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्यांनी ओळखीच्या आणि गरजू लोकांना आतापर्यंत 80 कोटी रुपयांहून अधिकचे शेअर भेट म्हणून दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

वैद्यनाथन यांच्याकडे इतके शेअर

सीईओ वैद्यनाथन यांच्याकडे आयडीएफसी फर्स्ट बँकेत जवळपास 1 टक्के वाटा आहे. त्यांनी यापूर्वी पण अनेक प्रसंगी लोकांना शेअर गिफ्ट केले आहेत. ज्यांना वैद्यनाथन यांनी शेअर भेट म्हणून दिले. त्यातील काही जण तर त्यांच्या ओळखीचे आहेत. तर काहीजणांना ते ओळखत सुद्ध नाहीत. पण गरजूंना शेअर देऊन त्यांनी त्यांच्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करुन ठेवली आहे. या सर्व प्रक्रियेत अर्थातच वैद्यनाथन यांनी कोणताही मोबादला घेतलेला नाही.

उधारीच्या मोबदल्यात 2 कोटींचे शेअर

सेवानिवृत्त विंग कमांडर संपत कुमार यांनी वैद्यनाथन यांना कधीकाळी 1000 रुपये उधार दिले होते. त्यावेळी वैद्यनाथन संपत कुमार यांना ही रक्कम पण परत करु शकले नव्हते. त्यानंतर वैद्यनाथन यशाच्या शिखरावर पोहचले. पण एक हजारांची उधारी ते विसरले नाहीत. त्यांनी कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांना शोधून काढले. त्यांना 2.5 लाखांचा शेअर गिफ्ट दिले. ही एक प्रकारे उधारी व्याजासहित चुकविण्याचे अनोखे उदाहरण म्हणावे लागेल. या शेअरचे मूल्य जवळपास 2 कोटी रुपये आहे.

या व्यक्तींना पण मदतीचा हात

वैद्यनाथन यांच्या दानशूरतेच्या अनेक कथा आहेत. त्यात त्यांनी त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना घर खरेदीसाठी, प्लॉट खरेदीसाठी, कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून, त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी तर कधी कधी मैत्रीसाठी हजार आणि लाखो शेअर दान केले आहेत. यामध्ये कर्मचारीच नाही तर जुने सवंगडी, त्यांच्या संघर्षकाळात मदत करणारे, तर काहींना ते ओळखतही नाही, अशा व्यक्तींचा समावेश आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.