Piyush Bansal : पीयूष बन्सल यांची महागडी डील, इतक्या कोटींचा खरेदी केला आशियाना
Piyush Bansal : Shark Tank मध्ये जज असलेले लेन्सकार्टचे पीयूष बन्सल यांनी दिल्लीत आलिशान घर खरेदी केले आहे. दिल्लीतील नीती बाग परिसरात त्यांनी हा बंगला घरेदी केला आहे. त्यासाठी बन्सल यांनी 1.08 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी चुकती केली आहे. त्याचे क्षेत्रफळ 469.7 चौरस मीटर म्हणजेच 5056 चौरस फूट आहे.

नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : Shark Tank India चे जज आणि लेन्सकार्टचे (Lenskart) सहसंस्थापक पीयूष बन्सल यांनी स्वतःसाठी आशियाना खरेदी केला आहे. त्यांनी नवी दिल्लीतील नीती बाग परिसरात स्वतःसाठी आलिशान बंगला खरेदी केला आहे. नीती बाग हा परिसर दिल्लीतील सर्वात महागड्या परिसरापैकी एक आहे. रिअल इस्टेट डाटा एनलॉटिक फर्म CRE Matrix नुसार, पीयूष बन्सल (Piyush Bansal) यांनी 19 मे 2023 रोजी घराची खरेदी केली. त्याची कागदपत्रं आता समोर आली आहेत. रिपोर्टनुसार, बन्सल यांनी यासाठी एकूण 1.08 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी जमा केली आहे. या बंगल्याचे क्षेत्रफळ 469.7 चौरस मीटर म्हणजेच 5056 चौरस फूट आहे.
इतक्या कोटींचा बंगला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीत जे घर खरेदी केले आहे. त्याची किंमत जवळपास 18 कोटी रुपये आहे. बन्सल यांनी जे घर खरेदी केले ते आलिशान आहे. हे घर 5056 चौरस फूट आहे.बन्सल यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दिल्लीतील ही नवीन करार आहे. मार्च महिन्यात दिल्लीतील टोनी गोल्फ लिंक्समध्ये भारताचे पूर्व एटर्जी जनरल मुकूल रोहतगी यांची पत्नी वसुधा रोहतगी यांच्या नावावर 2,160 चौरस यार्डचा बंगला आहे. त्याची किंमत 160 कोटी रुपये आहे.




बन्सल अब्जाधीश
पीयूष बन्सल यांनी नोव्हेंबर 2010 मध्ये अमित चौधरी आणि सुमीत कपाही यांच्यासोबत ओमनीचॅनल आयविअर रिटलेर लेन्सकार्टची स्थापना केली होती. ते या कंपनीचे आताही मुख्य कार्यकारी अधिकारी, सीईओ आहेत. 2019 मध्ये लेन्सकार्ट 1.5 अब्ज डॉलरच्या मूल्यासह युनिकॉर्न कंपनी झाली आहे. मीडिया रिपोर्टसनुसार पीयूष बन्सल यांची नेटवर्थ 600 कोटी रुपये आहे.
शार्क टँकचे हे आहेत जज
OYO Rooms चा संस्थापक रितेश अग्रवाल हा शार्क टँक इंडियात सहभागी होत आहे. रितेश बोटचा सहसंस्थापक अमन गुप्ता, शादी डॉट कॉमचा संस्थापक अनुपम मित्तल, शुगर कॉस्मेटिकची सीईओ विनिता सिंह आणि लेन्सकार्टचा सहसंस्थापक पीयूष बन्सल यांच्यासोबत शार्क्सच्या भूमिकेत दिसेल. रितेश इतर जजपेक्षा वयाने लहान असला तरी त्याची नेटवर्थ इतरांपेक्षा अधिक आहे.