इंडोनेशियामध्ये Palm Oil चा तुटवडा; …तर भारतामध्ये खाद्यतेलाचे दर आणखी वाढणार
भारतामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून खाद्यतेलाचे (Edible Oils) भाव थोडेसे कमी झाले आहेत. मात्र पुन्हा एकदा खाद्यतेल महागण्याची शक्यता आहे. येत्या काळात भारतामध्ये खाद्यतेलाच्या दरात तेजी दिसू शकते, ज्याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.
भारतामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून खाद्यतेलाचे (Edible Oils) भाव थोडेसे कमी झाले आहेत. मात्र पुन्हा एकदा खाद्यतेल महागण्याची शक्यता आहे. येत्या काळात भारतामध्ये खाद्यतेलाच्या दरात तेजी दिसू शकते, ज्याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे. देशात गेल्या 17 महिन्यातील सर्वोच्च महागाई (Inflation) आहे. पेट्रोल, डिझेल, दूध, जीएनजी, पीएनजी अशा सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. आता भरीस भर म्हणजे खाद्यतेलाचे भाव देखील वाढण्याची शक्यता आहे. जगात सर्वाधिक पाम (Palm Oil) ऑईलची निर्यात इंडोनेशियाकडून केली जाते. मात्र आता इंडोनेशियामध्येच पाम तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंडोनेशियामध्ये तेलाचा एवढा तुटवडा निर्माण झाला आहे की, तिथे देखील खाद्य तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. आणखी दुसरं कारण म्हणजे आपण युक्रेनकडून मोठ्याप्रमाणात सुर्यफुलाचे तेल आयात करतो. मात्र सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असल्यामुळे आयात, निर्यात प्रभावित झाली आहे. या दोन कारणांमुळे येत्या काळात भारतामध्ये खाद्यतेलाचे दर आणखी वाढू शकता असा अंदाज बांधला जात आहे.
इंडोनेशियामध्ये खाद्य तेलाचा तुटवडा
मिळत असलेल्या माहितीनुसार इंडोनेशियामध्ये पाम तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे इंडोनेशिया हा पाम तेलाची निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. तरी देखील तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पाम तेलाचा तुटवडा असल्याने खाद्यतेलाचे दर वर्षभरात जवळपास 57 टक्क्यांनी वाढले आहेत. इंडोनेशियामध्ये मार्च 2021 मध्ये एक लिटर खाद्य तेलाची किंमत 14,000 इंडोनेशियाई रुपये होती. 2022 मध्ये वाढून ती 22,000 इंडोनेशियाई रुपयांवर पोहोचली आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्याचे मोठे आव्हान तेथील सरकारपुढे आहे. जगातील अनेक देशांची अशीच अवस्था झाली आहे. जगात महागाईचा भडाक उड्याल्याचे पहायला मिळत आहे.
निर्यातीला प्रतिबंध
इंडोनेशियामध्ये खाद्य तेलाचा तुटवडा निर्माण झाल्याने तेथील सरकारने खाद्य तेलाच्या निर्यातीवर प्रतिबंध आणला आहे. इंडोनेशियामधून इतर देशात निर्यात होणाऱ्या पाम तेलाचा 20 टक्के हिस्सा हा देशांतर्गंत बाजापेठेत विकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे इंडोनेशियाकडून भारताला होणाऱ्या पाम तेलाची निर्यात कमी होऊ शकते. तसेच युक्रेनकडून होणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यात देखील घट झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतामध्ये खाद्यतेलाचे दर वाढू शकतात.
संबंधित बातम्या
GST स्लॅबमध्ये लवकरच मोठ्या बदलाची शक्यता; ‘अशी’ असेल नवी रचना