आठवले प्रभू श्रीराम! ताजपासून ते ओबेरॉयपर्यंत, हॉटेल कंपन्या अयोध्येत डेरेदाखल, असा थाटला उद्योग

Shri Ram Ayodhya | अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्यदिव्य मंदिराचे उद्धघाटन 22 जानेवारी रोजी होत आहे. यामुळे हॉटेल उद्योगाला नवीन उभारी मिळाली आहे. अयोध्येत 2021 पासून पर्यटकांची रीघ लागली आहे. अयोध्या आता धार्मिक राजधानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताजपासून ते ओबेरॉयपर्यंत अनेक हॉटेल कंपन्यांनी उद्योग थाटला.

आठवले प्रभू श्रीराम! ताजपासून ते ओबेरॉयपर्यंत, हॉटेल कंपन्या अयोध्येत डेरेदाखल, असा थाटला उद्योग
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 9:19 AM

नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : अयोध्येत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा येत्या 22 जानेवारी रोजी होत आहे. राम मंदिर होत असल्याने देशातूनच नाही तर जगभरातून भाविक भक्त दर्शनासाठी येणार आहेत. जगभरातील पर्यटकांसाठी पण अयोध्या हे हिलिंग डेस्टिनेशन ठरत आहे. अयोध्या जागतिक नकाशावर होतेच पण पर्यटक आवर्जून येथे भेट देत आहेत. त्यामुले हॉस्पिटॅलिटी उद्योगाला उभारी मिळाली आहे. स्थानिक हॉटेल्ससोबतच देशातील नामंवत ब्रँडला पण रामाची आठवण झाली आहे. या कंपन्यांनी अयोध्येत डेरा टाकण्याचे निश्चित केले आहे. ताज हॉटेलपासून ते ओबेरॉयपर्यंत अनेक बडे ब्रँड अयोध्येत हॉटेल उभारणार आहेत.

हॉटेल उद्योगाचे बुमिंग

अयोध्येत हॉटेल व्यवसायात गुंतवणूक वाढली आहे. काही रिपोर्टनुसार, दिग्गज हॉटेल कंपन्यांनी अयोध्येत त्यांच्या शाखा सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. काहींनी जमीन खरेदी केली आहे. तर काहींचे हॉटेल उभारणीचे कामही सुरु झाले आहे. सध्या हॉटेल उभारणीसाठी अयोध्येत 50 मुख्य प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. तर फैजाबाद आणि अयोध्येत जवळपास 100 हून अधिक हॉटेल आहेत. एका अंदाजानुसार, अयोध्येत येत्या काही दिवसांत प्रत्येक दिवशी एक लाख भाविक दर्शनाला येतील.

हे सुद्धा वाचा

बड्या ब्रँड्सची गुंतवणूक

अयोध्येतील हॉटेल्समधील रुमचे भाडे आताच एक लाख रुपयांच्या घरात पोहचले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हॉटेल उद्योगात बूम दिसून येईल. हॉटेल्ससह येथे गेस्ट हाऊसची संख्या वाढली आहे. धर्मशाळा आणि होम स्टेच्या संख्येत पण लक्षणिय वाढ झाली आहे. ताज हॉटेल, ओबेरायसह इतर अनेक बडे ब्रँड अयोध्येकडे वळले आहेत.

या कंपन्यांची हॉटेलसाठी गुंतवणूक

  • इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ताज हॉटेल आणि विवांता हॉटेल सुरु करणार
  • ताज समूह तीन फाईव्ह स्टार हॉटेल सुरु करणार
  • 2027 पर्यंत लक्स जिंजर 120 रुम्स तर विवांतामध्ये 100 खोल्या असतील
  • मॅरिएट इंटरनॅशनल, सरोवर हॉटेल्स आणि रिसॉर्ट, जेएलएल ग्रूप आणि रेडिसन पार्कची गुंतवणूक
  • ओ रामा अँड हॉटेलसाठी 140 कोटींचा खर्च, सोलिटायर अयोध्या 5 स्टार 100 कोटी खर्च
  • श्री रामा हॉटेल अयोध्येत 90 कोटी खर्च करणार, विश्रांती गड समूह 86 कोटी खर्च करणार
  • 5000 घरांना हॉटेलमध्ये बदलण्यात आले आहे
  • सध्या 550 स्टे होम आहेत तर 4000 अधिक स्टे होमसाठी अर्ज आले आहेत

पर्यटकांची लागली रीघ

उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या आकड्यानुसार, वर्ष 2021 मध्ये अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांची संख्या 3.25 लाख होती. 2022 मध्ये हा आकडा 85 पटीने वाढला. अयोध्येत 2.39 कोटी भाविक, पर्यटक आले. आता मंदिर तयार झाल्यावर त्यात 8-10 पट वृद्धी होण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, अयोध्यात दरवर्षी 20-25 कोटी पर्यटक भेट देतील.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.