Silver : सोन्यात नाही तर यामध्ये गुंतवणूकदारांची होईल ‘चांदी’! दोन वर्षांत भाव जातील लाखांच्या पुढे..

Silver : येत्या दोन वर्षांत या गुंतवणूकदारांची चांदी होणार आहे..

Silver : सोन्यात नाही तर यामध्ये गुंतवणूकदारांची होईल 'चांदी'! दोन वर्षांत भाव जातील लाखांच्या पुढे..
चांदी आणखी लकाकणारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 10:20 PM

नवी दिल्ली : भारतीयाचं सुवर्णप्रेम (Gold) जगजाहीर आहे. चीननंतर भारत सर्वाधिक गुंतवणूक सोन्यात करतो. पण एका अंदाजानुसार चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी (Silver) होणार आहे. येत्या दोन वर्षांत चांदीतून प्रचंड कमाई करता येणार आहे. कोरोनानंतर जगभरातील अर्थव्यवस्था (Economy) खुल्या होत आहे. उद्योगात चांदीची जबरदस्त मागणी वाढत आहे.

भारतासह जगभरात चांदीची मागणी वाढली आहे. 10 वर्षांत चांदीचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत चांदीचा भाव 1.25 लाख रुपये प्रति किलो होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कमोडिटी एक्सपर्ट अजय केडिया यांच्या दाव्यानुसार, भारतासह जगभरात यंदा चांदीच्या मागणीत जबरदस्त वाढ झाली आहे. उद्योगात चांदीचा वापर वाढल्याने यंदा चांदीच्या वापरात 16 टक्के वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

वाढत्या मागणीमुळे जागतिक बाजारात चांदीचा एकूण वापर 1.21 अरब औसवर पोहचला आहे. सिल्व्हर इन्स्टिट्यूटने एका अहवालात चांदीचे उत्पादन गेल्या दहा वर्षांत सर्वात कमी असल्याचा दावा केला आहे.

उत्पादनाच्या तुलनेत चांदीचा वापर वाढल्याने चांदीच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लंडनमध्ये सध्या 2016 नंतर चांदीचा साठा सर्वात नीच्चांकी स्तरावर पोहचला आहे. अहवालानुसार, चांदीचा अनेक उद्योगातील उपयोग वाढला आहे.

भारतासहीत जगभरातील देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर जोर देत आहेत. त्यासाठी सौर ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात येत आहे. सौर ऊर्जावरील उत्पादनासाठी चांदीची मोठी आवश्यकता आहे.

वाहनातील इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईससाठी ऑटोमेकर कंपन्या चांदीचा मोठा वापर करत आहेत. सोलर पॅनलसाठी एकूण चांदीचा वापर 10 टक्के तर वाहन क्षेत्रात 5 टक्के उपयोग होत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.