मुंबई : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपची रिलायन्स होम फायनान्स कंपनीची विक्री प्रक्रिया चालू आहे. ही कंपनी खरेदी करण्याची बाजारातील बड्या कंपन्यांनी तयारी दाखवली आहे. ज्यामध्ये अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीसह ऑथम इन्वेस्टमेंट प्रा.लिमिटेड सारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. (Six bidders Submits bids Anil Ambani reliance Home Finance)
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्सला खरेदी करण्यासाठी 6 कंपन्यांनी बोली लावली आहे. रिलायन्स होम फायनान्स कंपनीसाठी कोटक स्पेशल सिच्युएशन फंड, अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, ऑथम इन्वेस्टमेंट प्रा.लिमिटेड यासह अन्य कंपन्यांनी बोली लावली आहे.
रिलायन्स होम फायनान्सवर कर्जाचा बोझा आहे. कंपनी विक्रीला काढण्याचं कारण म्हणजे, इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्ससिएल सर्व्हिसेस लिमिटेड आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीच्या शेवटी कंपनीची 7729 कोटी रुपये थकबाकी होती. यामध्ये 4778 कोटी रुपयांच्या एनपीएचा समावेश आहे. 31 ऑक्टो. 2020 पर्यंत अंबानींवर 20 हजार कोटी रुपयांचं कर्ज होतं.
काही दिवसांपूर्वीच अंबानींची टेलिकॉम क्षेत्रातील रिलायन्स इंफ्राटेलला विधि न्यायधिकरणाने मंजुरी दिलेली आहे. रिलायन्स इंन्फ्राटेलच्या संपत्तीचं अधिग्रहन मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ करणार आहे. रिलायन्स इंन्फ्राटेलचे देशभर 43 हजार टॉवर तसंच 1 लाख 72 हजार किमीची फायबर लाईन आहे. यामुळे जवळपास 4 हजार कोटी रुपये रिकव्हर होणार आहे.
देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या पंक्तीत बसणारे उद्याेजक अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. वकिलाला फी देण्यासाठी पैसे नसल्याने घरातील दागिने विकल्याची माहिती अंबानी यांनी लंडनच्या न्यायालयाला काही दिवसांपूर्वी दिली.
अनिल अंबानी ग्रुपवर येस बँकेचं एकूण 12,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. अंबानी 2008 मध्ये जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती होते. अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपने येस बँकेचं 2,892 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्याने बँकेने सांताक्रूजमधील (मुंबई) 21,000 चौरस फूटपेक्षा अधिक क्षेत्रफळाची मुख्यालय इमारत आणि दक्षिण मुंबईमधील नागिन महलमधील दोन मजल्यांचा ताबा येस बँकेने जुलै महिन्यात घेतलेला आहे.
(Six bidders Submits bids Anil Ambani reliance Home Finance)
हे ही वाचा :
Yes Bank | कर्ज फेडण्यास असमर्थ, Yes बँकेकडून अनिल अंबानी ग्रुपचं मुख्यालय टेकओव्हर
Yes Bank | ‘रिलायन्स समुहा’चे अध्यक्ष अनिल अंबानींना ‘ईडी’चे समन्स
रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरीच्या मार्गावर, अनिल अंबानींचा संचालक पदाचा