देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू आणि विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अनेकजण त्यांची आर्थिक स्थिती सुधरावी यासाठी विविध पर्याय शोधत आहे.
लॉकडाऊनमध्ये पैशांची गरज असेल तर ऑनलाईन बंद करा एफडी; 2 मिनिटांत ट्रान्सफर करा पैसे
कोरोना काळात कुरिअर, पार्सल, डिलिवरीच्या व्यवसायात बरीच वाढ झाली आहे. अनेक ई-कॉमर्स कंपन्या, ऑनलाईन खाद्य पदार्थ विकणाऱ्या कंपन्यांच्या व्यवसायात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही स्थानिक पातळीवर डोअर स्टेप डिलिव्हरीचा व्यवसाय सुरु करु शकता.
हा व्यवसाय सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील डिलिव्हरीशी संबंधित असू शकतो. यात किराणा, औषधे यासारखी उत्पादनांची डिलिव्हरी केली जाऊ शकते.
हॉटेल व्यवसाय, प्रातनिधिक फोटो
तसेच जर तुम्ही नोकरी करणारे काही ग्राहक तयार केले तर त्यातून तुम्हाला सहजरित्या हजारो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. हे काम स्थानिक पातळीवर करायचे असल्याने यासाठी तुम्हाला कोणत्याही गुंतवणूक किंवा पदोन्नतीची आवश्यकता नाही.
कोरोनामुळे बहुतांश शाळा ऑनलाइन सुरू आहेत.
कोरोना काळात इंटरनेट डेटाचा वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक युट्यूबरवर पैशांची भरभराट होत आहे. जर तुम्ही एखाद्या कामात कुशल असाल तर तुम्ही त्याचे व्हिडीओ बनवून युट्यूबवर अपलोड करु शकता. यानंतर जेवढे तुमचे सब्सक्रायबर्स वाढतील, तितकी जास्त तुम्ही कमाई होईल. यासाठी तुम्हाला फक्त तुमची माहिती मनोरंजकरित्या सर्वांसमोर मांडावी लागेल. याद्वारे तुम्ही सहजरित्या कमवू शकता.
सध्या बरेच जण फिटनेस, आरोग्याची काळजी, योगा यासर्व गोष्टींवर भर देत आहे. त्यामुळे जर तुम्हीही योगा एक्सपर्ट किंवा फिटनेस एक्सपर्ट असाल तर तुम्ही ऑनलाईन क्लास घेऊ शकता.