1 मेपासून तुमच्या आयुष्यात ‘हे’ बदल होणार

मुंबई : बँक, गॅस सिलेंडर, रेल्वे सेवेसह काही गोष्टींमध्ये एक मे पासून बदल होणार आहेत. नोकरदारांपासून ते अगदी उद्योगपतींपर्यंत हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत. येत्या 1 मे पासून 5 महत्त्वाचे बदल होणार आहेत. यातले काही बदल खर्च वाढवणारे आहेत, तर काही खर्च कमी करणारे. एक मे पासून कोणते बदल होतील? 1. रेल्वेच्या नियमात बदल : रेल्वेचं […]

1 मेपासून तुमच्या आयुष्यात 'हे' बदल होणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई : बँक, गॅस सिलेंडर, रेल्वे सेवेसह काही गोष्टींमध्ये एक मे पासून बदल होणार आहेत. नोकरदारांपासून ते अगदी उद्योगपतींपर्यंत हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत. येत्या 1 मे पासून 5 महत्त्वाचे बदल होणार आहेत. यातले काही बदल खर्च वाढवणारे आहेत, तर काही खर्च कमी करणारे.

एक मे पासून कोणते बदल होतील?

1. रेल्वेच्या नियमात बदल : रेल्वेचं रिझर्व्हेशन करणाऱ्यांना एक मेपासून नवी सुविधा दिली जाणार आहे. 1 मेपासून रेल्वेचा चार्ट बनवण्याच्या 4 तास आधीपर्यंत प्रवाशी आपलं बोर्डिंग स्टेशन बदलू शकतात. सध्या 24 तास आधी बोर्डिंग स्टेशन बदलता येतं. म्हणजे, रेल्वे रिझर्व्हेशन करताना जे बोर्डिंग स्टेशन तुम्ही निवडता, ते बदलायचे झाल्यास, चार्ट बनवण्याच्या 4 तास आधीपर्यंत बदलू शकता. मात्र, बोर्डिंग स्टेशन बदलण्याच्या सुविधेचा लाभ घेतला, तरी तिकीट रद्द झाल्यावर रिफंड मात्र मिळणार नाही.

2. एअर इंडियाकडून गिफ्ट : एअर इंडिया ही सरकारी विमानसेवा पुरवणारी कंपनी येत्या 1 मे पासून तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. अनेकदा विमान प्रवास करणारे प्रवाशी तिकीट रद्द करतात. तिकीट रद्द केल्याने त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येतं. मात्र यापुढे एअर इंडिया प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास किंवा त्यात बदल केल्यास अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. मात्र, यासाठी प्रवाशांची तिकीटंही 7 दिवसांपूर्वीची असणं गरजेचं आहे.

3. एसबीआय बँकेत होणार बदल : नवीन आर्थिक वर्षात (2019-20) देशातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) डिपॉझिट आणि कर्जाच्या व्याज दरात बदल करणार आहे. रिझर्व्ह बँकने (आरबीआय) दिलेल्या नव्या नियमावलीनुसार, रेपो रेटमध्ये बदल केल्यानंतर लगेचच सर्व बँकांना डिपॉझिट किंवा कर्जाच्या व्याजाची रक्कमेत बदल करावी लागणार आहे. त्यामुळे आरबीआयने रेपो रेटमध्ये बदल केल्यास याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यावरील रकमेचे व्याज कमी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण हा नवा नियम फक्त 1 लाखांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या बचत खाते किंवा कर्जावर लागू होणार आहे.

4. पीएनबी बँकेची ही सेवा होणार बंद : पंजाब नॅशनल बँक येत्या 1 मे पासून आपले डिजीटल वॉलेट PNB Kitty बंद करणार आहे. यामुळे पीएनबी बँकने ग्राहकांना आज रात्री 12 पर्यंत पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले आहे. या डिजीटल वॉलेटमधून IMPS द्वारे बँक अकाऊंटमध्ये पैस ट्रान्सफर करता येऊ शकतात. तसेच पीएनबी बँक PNB Kitty या डिजीटल वॉलेटऐवजी दुसरे डिजीटल वॉलेट सुरु करणार आहे.

5. सिलेंडरच्या दरात बदल : उद्यापासून स्वयंपाकघरातील सिलेंडरचे नवे दर लागू होणार आहे. सिलेंडरचे दर वाढणार की कमी होणार हे येत्या दिवसात स्पष्ट होईल. पण या बदलामुळे याचा फटका थेट ग्राहकांना बसणार आहे.

कर्ज काढताय? बँकेत जाण्याआधी ‘ही’ कागदपत्रं जवळ ठेवा

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.