नवी दिल्ली | 22 डिसेंबर 2023 : रतन टाटा हे भारतीय उद्योगजगतातील हिरा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांचा साधेपणा, दिलदारपणा आणि राष्ट्रप्रेमाची अनेक उदाहरणं आहेत. तरुणाई त्यांना सोशल मीडियावर फॉलो करते. टोटा मोटर्स ही कंपनी तोट्यात गेल्यावर ती विक्री करण्यासशिवाय पर्याय उरला नव्हता. रतन टाटा यांची त्यासाठी फोर्ड कंपनीशी बोलणी झाली. 90 च्या दशकात इंडिका फ्लॉप झाल्याने हे संकट आले होते. टाटा विक्रीसाठी अमेरिकेत पोहचले. पण बैठकीत असे काही घडले की टाटा यांनी कंपनी विक्रीचा निर्णय रद्द केला आणि आज टाटा मोटर्स 2.41 लाख कोटी रुपयांची कंपनी झाली आहे. जगातील काही नामवंत ब्रँड या कंपनीच्या पंखाखाली आले आहेत. तर ईव्ही सेक्टरमध्ये पण टाटा मोटर्सने नाव कमावले आहे.
गुंतवणूकदारांना दिला 90 टक्के परतावा
टाटा मोटर्सने गुंतवणूकदारांना पण मालामाल केले. यावर्षात 2023 मध्ये टाटा मोटर्सने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना जवळपास 90 टक्के रिटर्न दिला. सध्याच्या काळात कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांच्या पसंतीचा आहे. हा शेअर काही दिवसांतच मोठी भरारी घेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळेच अनेक गुंतवणूकदार टाटा मोटर्सला समोर आणण्यात रतन टाटा यांचा करिष्मा असल्याचे सांगतात.
टाटा मोटर्स विक्रीचा मुहूर्त हुकला
90 च्या दशकात रतन टाटा हे टाटा मोटर्स विक्री करणार होते. टाटा इंडिका बाजारात कमाल दाखवू शकली नाही. त्यामुळे कंपनीत घाट्यात पोहचली. रतन टाटा यांनी पॅसेंजर कार सेगमेंट विक्रीचा निर्णय घेतला. त्यांनी अमेरिकेतील फोर्ड मोटर्सशी बोलणी केली. त्यासाठी ते अमेरिकेत पोहचले. त्यांनी बिल फोर्ड यांच्याशी बोलणी केली. त्यावेळी फोर्ड यांनी टाटा यांच्या या व्यवसायाची खिल्ली उडवली. ज्या व्यवसायाची माहितीच नाही, ती सुरु करण्यात काय हाशील केले, असा उपरोधीक रोख फोर्ड यांचा होता. हा व्यवसाय खरेदी करुन आपण जणू टाटा यांच्यावर उपकार करत आहोत, असा त्यांचा आविरभाव होता.
आणि टाटा यांनी दाखवला करिष्मा
बिल फोर्ड यांचे शब्द रतन टाटा यांच्या स्वाभिमानाला टोचले. त्यांनी तिथेच टाटा मोटर्स विक्रीचा निर्णय रद्द केला. त्यांनी ऑटो सेक्टरमध्ये पुन्हा तयारीनीशी उतारण्याचा चंग बांधला. त्यांच्या संघर्षाला, दुरदृष्टीला यश आले. आज ऑटो सेक्टरमध्ये टाटा मोटर्सचा दबदबा आहे. टाटा मोटर्सने ईव्ही सेक्टरमध्ये तर मोठी उंची गाठली. टेस्ला सारख्या कंपन्यांना टाटा मोटर्स टफ फाईट देण्याच्या तयारीत आहे.
शेअरची उच्चांकी भरारी
सध्या टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर जवळपास 2 टक्के तेजीसह 722.50 रुपयांवर व्यापार करत होता. व्यापारी सत्रादरम्यान कंपनीचा शेअर 731 रुपयांवर पोहचला. कंपनीचे बाजारातील मूल्य 2.41 लाख कोटी रुपये झाले आहे. तर या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचे मूल्य 1.31 लाख कोटी रुपये होते. एकाच वर्षात कंपनीचे बाजारातील मूल्य 1.10 लाख कोटीने वाढले.