नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bond Scheme 2023-24) आणली आहे. या योजनेने 2015 पासून चांगला परतावा दिला आहे. ग्राहकांना व्याजासह सोन्यावर चांगला परतावा पण मिळाला आहे. बाजार भावापेक्षा हे सोने स्वस्त मिळणार आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष 2023-24 पासून स्वस्त सोन्याची ही दुसरी मालिका सुरु केली आहे. या 11 सप्टेंबरपासून हा टप्पा सुरु होत आहे. या योजनेतंर्गत ग्राहकांना इतक्या स्वस्तात सोने खरेदी करता येईल. या योजनेत केंद्र सरकारची हमी मिळते. गुंतवणूकदारांची फसवणूक होत नाही. त्यांना चांगला परतावा मिळतो. भारतातच बुलियन एक्स्चेंजची (Billion Exchange) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोने आयात करणे सोपं होणार आहे. लवकरच देशभरात काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सोन्याचा एकच भाव (One Nation One Rate) राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पाच दिवसांत लयलूट
सुवर्ण रोखे योजनेत नागरिकांना पाच दिवसांत लयलूट करता येईल. त्यांना स्वस्तात सोने खरेदीची संधी मिळेल. 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत या योजनेतंर्गत गुंतवणूक करता येईल. सोने ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने खरेदी करता येईल. या योजनेतंर्गत ग्राहकांना 24 कॅरेट शुद्ध सोने खरेदी करता येईल. 99.9 टक्के शुद्ध सोन्यात ही गुंतवणूक करता येते. गुंतवणूक केल्यानंतर त्याचा चांगला परतावा आतापर्यंत मिळाला आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते.
किती मिळते व्याज
गुंतवणूकदारांना सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाईल. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांना त्यापूर्वीच 5 व्या वर्षी योजनेतून बाहेर पडता येते.
अशी करा खरेदी
या योजनेतंर्गत स्वस्त सोने तुम्हाला स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचे (Stock Exchanges), NSE आणि BSE येथून खरेदी करता येईल. डीमॅट खात्यातून या योजनेत गुंतवणूक करता येते.
काय आहे इश्यू प्राईस
या योजनेची अधिसूचना 8 सप्टेंबर रोजी काढण्यात आली. सॉव्हरिन गोल्ड बाँडची ही दुसरी मालिका आहे. आरबीआयने त्यासाठी इश्यू प्राईस 5,923 रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. 99.9 टक्के शुद्ध सोने तुम्ही ऑनलाईन खरेदी केल्यास 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत मिळते. त्यामुळे सोने अजून स्वस्त म्हणजे 5,873 रुपये प्रति ग्रॅम होते.(Gold Rate Today)