Anant-Radhika च्या शाही लग्नात VIP मंडळींना मिळाले हे खास गिफ्ट…किंमत आहे 2 कोटी

Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे शाही लग्न देशातच नाही तर परदेशात पण चर्चेचा विषय ठरले. यामध्ये सहभागी व्हिआयपी पाहुण्यांना या राजेशाही लग्नात खास गिफ्ट मिळाले. या लग्नाची खास आठवण आता त्यांच्यासोबत कायमची जोडल्या गेली.

Anant-Radhika च्या शाही लग्नात VIP मंडळींना मिळाले हे खास गिफ्ट...किंमत आहे 2 कोटी
व्हीआयपींसाठी खास गिफ्ट
Follow us
| Updated on: Jul 14, 2024 | 4:47 PM

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हिचे शाही लग्न थाटामाटात लागले. शुक्रवारी 12 जुलै 2024 रोजी दोघांनी सात फेरे घेतले. या लग्न सोहळ्यात मुकेश अंबानी यांचे देशासह परदेशातील अनेक मित्र आणि बडी मंडळी सहभागी झाल्या. बॉलिवूड, हॉलिवूड सेलेब्रिटी सहभागी झाल्या. त्यांनी अनंत आणि राधिकाला आशिवार्द दिले. अंबानी कुटुंबियांकडून या VIP पाहुण्यांना खास रिटर्न गिफ्ट मिळाले. त्याची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे.

व्हीआयपी पाहुण्यांना मोठे गिफ्ट

अनंत आणि राधिकाच्या विवाह सोहळ्याला देशातील आणि परदेशातील बड्या मंडळींनी, सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. अनंत अंबानीच्या मित्रांनी या लग्न सोहळ्यात एकच धमाल केली. अनेकांनी लक्षवेधी नृत्य केले. अनेक क्रिकेटर्स, इतर खेळाडू यावेळी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

या लग्न सोहळ्याला उपस्थित व्हीआयपी पाहुण्यांना मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांकडून महागडी भेट वस्तू देण्यात आली. त्यांना आलिशान घड्याळं देण्यात आली. त्यांची बाजारातील किंमत 1.5 कोटी ते 2 कोटी रुपये इतकी आहे. व्हीआयपी गेस्टला हे गिफ्ट देण्यात आले. त्याची छायाचित्र पण सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

काय खास आहे या घड्याळात

Audemard Piguet या लक्झरियस ब्रँडची घड्याळं सेलेब्रिटींना गिफ्ट म्हणून देण्यात आली. हे मनगटी घड्याळ 18 कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आले आहे. त्यात खास क्रिस्टल आहेत. डार्क ब्लू डायल मन मोहून घेते. 25 या लिमिटेड एडिशन घड्याळं अनंत अंबानी यांनी त्यांच्या खास मित्रांसाठी मागवली होती. या घडाळ्यांची किंमत 2 कोटी 8 लाख 79 हजार रुपये इतकी आहे. शाहरुख खान,रणवीर सिंह, मिजान जाफरीसह अनेक दिग्गजांच्या हातात हे घड्याळ दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाची जगभर चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून या लग्नपूर्व सोहळे आणि लग्नानंतरच्या विधींनी सर्वांचे लक्ष वेधले. या कालावधीत गुजरात आणि मुंबईत पण जेवणावळी, सेलेब्रिटींचे कार्यक्रम, लग्नविधी याचीच चर्चा होती. या लग्नसाठी कोट्यवधी रुपये पाण्यासारखे खर्च करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली आणि वधु-वराला आशीर्वाद दिले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.