सोनं स्वतात खरेदी करा! RBI कडून डिजिटल पेमेंटवर खास ऑफर

दहाव्या सिरीजसाठी रिझर्व्ह बँकेनं एक ग्राम सोन्याची किंमत 5 हजार 104 रुपये निश्चित केली आहे. एखादा गुंतवणूकदार यासाठी ऑनलाईन अर्ज करेल आणि डिजीटल पेमेंट करेल त्याला सोन्यात प्रति ग्राम 50 रुपये सूट मिळणार आहे.

सोनं स्वतात खरेदी करा! RBI कडून डिजिटल पेमेंटवर खास ऑफर
gold silver price
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 3:52 PM

मुंबई: कोरोना काळात महागलेलं सोनं अद्याप कमी होण्याचं नाव घेत नाही. लग्नसराई आणि अनेक उत्सवांसाठी सोनं खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी सोनं महाग झाल्यानं मोठा फटका बसतोय. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे. चालू आर्थिक वर्षात सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या दहाव्या सिरीजनुसार गुंतवणूकदार 11 ते 15 जानेवारीदरम्यान गुंतवणूक करु शकतात. यासाठी 19 जानेवारी सेटलमेंटची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.(Special offer from RBI on digital payment for gold buyers)

दहाव्या सिरीजसाठी रिझर्व्ह बँकेनं एक ग्राम सोन्याची किंमत 5 हजार 104 रुपये निश्चित केली आहे. एखादा गुंतवणूकदार यासाठी ऑनलाईन अर्ज करेल आणि डिजीटल पेमेंट करेल त्याला सोन्यात प्रति ग्राम 50 रुपये सूट मिळणार आहे. त्या खरेदीदारासाठी सोन्याची किंमत 5 हजार 54 रुपये असणार आहे. सराफा बाजारात गेल्या काही महिन्यात सोन्याची किंमत 50 हजाराच्या आसपास राहिली आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं 28 डिसेंबर 2028 रोजी सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या नवव्या सिरीजसाठी सबस्क्रिप्शन सुरु केलं होतं. त्यावेळी सोन्याची किंमत 5 हजार रुपये प्रति ग्राम होती. RBI भारत सरकारच्या वतीनं सॉवरेन गोल्ड बॉन्ड जारी करत असतं.

2015 मध्ये योजनेची सुरुवात

सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना 2015 मध्ये सुरु करण्यात आली आहे. खरेदीदार फिजिकल गोल्ड ऐवजी डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करेल यासाठी ही योजना आणली गेली. या योजनेत गुंतवणूकदारांना वर्षाकाही ठराविक इंट्रेस्टही मिळतो. सध्या सॉवरेन गोल्ड बॉन्डवर वर्षाला 2.5 टक्के व्याज मिळतं.

सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक का करावी?

सॉवरेन गोल्ड बॉन्डमधील गुंतवणूक अनेक अर्थानं फायदेशीर आहे. यात कमीत कमी 1 ग्राम आणि जास्तीत जास्त 4 किलोची मर्यादा आहे. हा बॉन्ड 8 वर्षांसाठी जारी केला जातो. यासाठी लॉक इन कालावधी 5 वर्षे आहे. ज्यावेळी तुम्हाला याची विक्री करायची आहे. तेव्हा मार्केटच्या हिशोबाने तुम्हाला किंमत मिळेल. गुंतवणूकदार ज्या दिवशी आपला बॉन्ड विक्री करणार आहे. त्याच्या आधीच्या तीन दिवसांत 999 प्युरिटी असलेल्या सोन्याच्या किमतीनुसार तुम्हाला रक्कम मिळते.

टॅक्स संबंधी नियम

या बॉन्डमध्ये गुंतवणूकदारांचा अजून एक फायदा हा की कॅपीटल गेन इंडिव्हिज्यूअलसाठी हा बॉन्ड टॅक्स फ्री आहे. मात्र इंट्रेस्ट इनकमवर टॅक्स आहे. यात लॉन्ग टर्म कॅपिटल गेनमध्ये इंडेक्शन बेनिफिट मिळतो. इंडेक्शन बेनिफिट हे कॅपिटल गेनशी संबंधित आहे.

सोन्याचा कालचा भाव?

मुंबई –

सोने – 49,470 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

पुणे –

सोने – 49,470 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

जळगाव –

सोने – 50,955 प्रति तोळा

चांदी – 65,462 प्रति किलो

नागपूर –

सोने – 49,470 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

नाशिक –

सोने – 49,470 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

संबंधित बातम्या:

SBI अलर्ट | Instant Loan App पासून सावधान, पैशांची गरज असल्यास ‘हे’ करा

Gold Price Drop | सोन्याच्या भावात घसरण, सोनं-चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे भाव

Special offer from RBI on digital payment for gold buyers

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.