SpiceJet Offer | स्पाईस जेटची स्पेशल ऑफर; तुम्हीही बुक करू शकता ‘चार्टर प्लेन’

स्पाईसजेटने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांसाठी चार्टर प्लेनची सुविधा खुली केली आहे. या सुविधेचा लाभ कुणीही घेऊ शकेल. (SpiceJet's special offer; You can also book a charter plane)

SpiceJet Offer | स्पाईस जेटची स्पेशल ऑफर; तुम्हीही बुक करू शकता ‘चार्टर प्लेन’
आता विमानात बसून बुक करता येणार टॅक्सी, या विमान कंपनीने सुरू केली ही सेवा
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 5:25 PM

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. विमान वाहतुकीला या विषाणू संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. अनेक लोक विषाणूच्या दहशतीमुळे विमान प्रवास टाळू लागले आहेत. कारण, विमानात एखादा जरी प्रवासी कोरोनाबाधित असेल, तरी त्याच्यापासून सर्व प्रवाशांना संसर्गाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे इच्छा असूनही तसेच काही कारणांमुळे तातडीचा प्रवास गरजेचा असतानाही अनेक लोक विमानाकडे पाठ फिरवू लागले आहेत. अशा लोकांसाठी स्पाईस जेट विमान कंपनीने स्पेशल सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेतल्यास तुम्ही कोरोना काळातही बिनधास्त विमान प्रवास करू शकणार आहात. (SpiceJet’s special offer; You can also book a charter plane)

ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्या लोकांना या सुविधेचा लाभ सहजासहजी घेता येणार आहे. स्पाईसजेटने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांसाठी चार्टर प्लेनची सुविधा खुली केली आहे. या सुविधेचा लाभ कुणीही घेऊ शकेल. स्पाईसजेटच्या या चार्टर प्लेनचे बुकिंग कसे करायचे, किती दिवस आधी बुकिंग करता येईल, यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे, हे आपण जाणून घेऊया. जे लोक आपले चार्टर प्लेन बुक करतील, ते लोक त्यांच्या वैयक्तिक जागेसह आणि गोपनीयतेसह कोठेही प्रवास करू शकतात. स्पाईसजेटने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे चार्टर प्लेन बुक करण्याबद्दल सविस्तर माहिती जाहिर केली आहे.

चार्टर प्लेन किती प्रकारचे आहेत?

स्पाईसजेटकडून चार प्रकारच्या चार्टर प्लेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून आपण एकट्याने प्रवास करू शकाल किंवा आपल्या खास लोकांसोबत प्रवासासाठी विमानाचे बुकिंग करू शकता. तुम्ही किती लोकांची तिकिटे बुक करू शकता, याबाबत स्पाईसजेटने आपल्या मेल लेटरमध्ये माहिती दिली आहे.

– सी 90 दोन लोकांसाठी बुक केले जाऊ शकते. या विमानात 5 प्रवासी प्रवास करू शकतात आणि जवळपास 5 प्रवाशांकरीता विमानाचे बुकिंग केले जाऊ शकते.

– क्यू 400 जवळपास 90 लोकांसाठी बुक केले जाऊ शकते. हे विमान सी 90 विमानापेक्षा आकाराने खूप मोठे असते.

– बोईंग 737 हे एक प्रवासी विमान आहे, ज्यामध्ये 100 ते 200 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. जर 200 लोकांना एकत्रितपणे कोठेतरी जायचे असेल तर त्यांना हे विमान बुक करणे अत्यंत सोईचे ठरेल.

– ए 330-900 निओ लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम आहे. हे विमान 200 ते 350 प्रवाशांसाठी बुकिंग करता येऊ शकते.

बुकिंग कसे करावे?

स्पाईसजेटच्या या चार्टर प्लेन बुकिंगसाठी आपण अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करू शकता. या व्यतिरिक्त चार्टर बुकिंगसाठी एक चौकशी पेजदेखील आहे, जिथे आपल्याला आपला तपशील द्यावा लागेल. यानंतर आपल्याला चार्टर प्लेनच्या तिकिट दराबद्दल माहिती मिळेल. तसेच आपण charters@spicejet.com वर मेल पाठवून माहिती मिळवू शकता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध पावले

स्पाईसजेट विमानात स्टेट ऑफ द आर्ट एअर सर्कुलेशन सिस्टमचा वापर केला जात आहे. याद्वारे एअर केबिनमधील वायुप्रवाह वेगळ्या प्रकारे राखला जातो. त्यामुळे हवेत फिरणाऱ्या विषाणूचा संसर्ग टाळता येतो. या विशेष पद्धतीमुळे विमानात हवेचा प्रवाह पुढून मागच्या बाजूस जाऊ शकत नाही. त्याऐवजी हवा वरुन खाली वाहते. या विशेष व्यवस्थेमुळे विमान प्रवाशांना विषाणू संसर्गाचा धोका होत नाही. (SpiceJet’s special offer; You can also book a charter plane)

इतर बातम्या

मोठी बातमी | SBI, HDFC, ICICI सह देशातील बड्या बँका केवळ 4 तासांसाठी उघडणार, ही 4 कामे होणार

लसीचं वावडे असलेलं गाव, अफवेमुळे कोणीही लस घेईना, पश्चिम महाराष्ट्रातील गावाचा ग्राऊंड रिपोर्ट

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.