Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Starbucks CEO | ग्लोबल कॉफी हाऊस स्टारबॅक्समध्येही भारतीयचा डंका, लक्ष्मण नरसिंहन नवीन सीईओ

Starbucks CEO | ग्लोबल कॉफी चेन हाऊस स्टारबक्समध्येही भारतीयचा डंका वाजला आहे. भारतीय वंशांचे लक्ष्मण नरसिंहन हे कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम पाहतील. ते पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत.

Starbucks CEO | ग्लोबल कॉफी हाऊस स्टारबॅक्समध्येही भारतीयचा डंका, लक्ष्मण नरसिंहन नवीन सीईओ
पुन्हा एका भारतीयाची वर्णी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 12:15 PM

Starbucks CEO | ग्लोबल कॉफी चेन हाऊस स्टारबक्समध्येही (Starbucks)भारतीयचा डंका वाजला आहे. भारतीय वंशांचे लक्ष्मण नरसिंहन (Laxman Narasimhan) हे कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम पाहतील. ते पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. नरसिंहन सध्या आरोग्य आणि स्वच्छता कंपनी रेकिटचे (Reckitt) प्रमुख आहेत. ते ऑक्टोबरमध्ये स्टारबक्समध्ये सहभागी होतील. एप्रिल 2023 मध्ये सध्याचे सीईओ हॉवर्ड शल्ट्झ (Howard Shultz) यांनी पदभार सोडल्यानंतर त्यांचे काम नरसिंहन संभाळणार आहेत. जागतिक स्तरावर भारतीय सीईओंचा डंका वाजला आहे. अनेक मोठी नावे आज जागतिकस्तरावर गाजत आहेत. त्यात आता नरसिंहन यांचे नाव जोडल्या गेले आहे. नरसिंहन हे भारतीय वंशाच्या सीईओंच्या यादीत सामील झाले आहेत. स्टारबक्स ही अमेरिकेतील मोठी कंपनी आहे. साखळी पद्धतीने ती अनेक देशात विस्तारलेली आहे.

जागतिक कंपन्यांमध्ये भारतीयांचा डंका

अनेक जागतिक कंपन्यांची धुरा भारतीय वंशांचे दिग्गज सांभाळत आहेत. या जागतिक कंपन्यांनी मोठ्या आशेने त्यांच्या हातात धुरा दिली होती. त्यांनी या संधीचे सोने केलेले आहे. त्यामुळे इतर कंपन्यांनीही त्यांचे अनुकरण केले. भारतीय टँलेटला योग्य प्लॅटफॉर्म मिळत आहे. विविध कंपन्यांच्या सीईओच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, अल्फाबेटचे सुंदर पिचाई, अॅडोबचे शंतनू नारायण, डेलॉइटचे पुनीत रंजन आणि फेडएक्सचे राज सुब्रमण्यम यांचा समावेश आहे. याआधी इंद्रा नूयी या पेप्सिको आणि अजय बंगा मास्टरकार्डसारख्या दिग्गज कंपन्यांचे सीईओ होते.

पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी

स्टारबक्सच्या पुढील सीईओ नरसिंहन यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. पुढील शिक्षणासाठी त्यांनी अमेरिका गाठली. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील लॉडर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी जर्मन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या द वॉर्टन स्कूलमधून फायनान्समध्ये एमबीए केले आहे. त्यानंतर त्यांचे करिअर विविध कंपन्यांमधून घडत गेले. त्यांनी आता लांबचा पल्ला गाठला आहे.

हे सुद्धा वाचा

नरसिंहन यांची प्रतिक्रिया काय ?

कॉपी आणि बरेच काही, असे आपण नेहमी म्हणतो. संबंध आणि भावनांद्वारे मानवतेला पुढे नेण्याच्या स्टारबक्सच्या बांधिलकीने कंपनीला इतरांपेक्षा वेगळे केले आहे, असे नरसिंहन म्हणाले. स्टारबक्स हा जागतिक स्तरावर ओळखला जाणारा ब्रँड आहे. ज्याने कॉफीवर लोकांना कनेक्ट केले आहे, त्यांना जवळ आणले आहे. अशा निर्णायक वेळी या प्रतिष्ठित कंपनीशी जोडले गेल्याचा आनंद होत असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात कंपनी भागीदार, ग्राहक यांना पुन्हा एकत्र करण्याचा अनुभव देणार आहे. आजच्या बदलत्या युगाच्या मागणीनुसार कंपनी बदल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नरसिंहन यांनी त्यांचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यानुसार, टीमवर्कने ते काम करणार आहेत. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची योजना आहे. गुंतवणूकदार, भागीदार यांची मते ही ते जाणून घेणार आहेत. ते एप्रिल महिन्यात अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत.

नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....