Cryptocurrency : ही गंमत ठरली लाखमोलाची! या क्रिप्टोकरन्सीने बदलून टाकले अनेकांचे आयुष्य

Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीवर तरुणांच्या आजही उड्या पडत आहे. या करन्सीला अनेक देशांची मान्यता नाही. पण यातील काही चलन गंमत म्हणून सुरु करण्यात आली होती. पण त्यांनी इतिहास घडवला. अनेक गुंतवणूकदारांना मालामाल केले.

Cryptocurrency : ही गंमत ठरली लाखमोलाची! या क्रिप्टोकरन्सीने बदलून टाकले अनेकांचे आयुष्य
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 6:00 PM

नवी दिल्ली : ट्विटरचा (Twitter) नवीन लोगो तुम्ही पाहिलाच असेल. रात्रीतूनच ट्विटरची चिमणी भूर्रकन उडाली. लोगोमधली निळ्या रंगाची चिमणी गायब झाली. त्यामुळे युझर्स काही काळ संभ्रमात राहिले. त्यांना चिमणीच्या जागी डॉगीचा लोगो दिसला. ट्विटरने चिमणीऐवजी कुत्र्याला स्थान दिले. 1 एप्रिल नुकताच झाल्याने अनेकांना हे एप्रिल फुल तर नाही ना असे वाटले. त्यानंतर थोड्याच वेळात ट्विटरवर हॅशटॅग DOGE हा ट्रेंड चालला. तर काही वर्षांपूर्वी क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये (Cryptocurrency) असाच प्रयोग झाला. हा प्रयोग गंमती गंमती सुरु झाला. पण त्याने अनेकांची आयुष्य बदलवून टाकली. अनेकांना मोठा फायदा झाला. त्यामुळे Dogecoin नेहमी चर्चेत राहिली. पण भारतीय रिझर्व्ह बँकेने अद्यापही क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिलेली नाही.

काय आहे Dogecoin क्रिप्टोकरन्सी Dogecoin ही एक क्रिप्टोकरन्सी आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर बिली मारकस आणि जॅक्सन पॉल्मर यांनी हे अभासी चलन तयार केले. बिटकॉईनची टर्र उडविण्यासाठी हे आभासी चलनाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी क्रिप्टोकरन्सी व्यवस्था नवी होती. त्यावेळी अनेक अंदाज बांधण्यात येत होता. सॉफ्टवेअर इंजिनिअरने या मीम कॉईनची निर्मिती केली. हे पहिले डॉग कॉईन तयार झाले. या डॉग कॉईनमध्ये गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली. Dogecoin च्या लोगोत कुत्र्याचा चेहरा दिसून येतो. डोगे मीम आणि शीबा इनु या चलनात कुत्र्याचे चित्र आहे.

दहा वर्षांपूर्वी बाजारात हे चलन 6 डिसेंबर 2013 रोजी बाजारात आले होते. या चलनाने लागलीच ऑनलाईन कम्युनिटी तयार केली. 5 मे 2021 रोजी कॉईनचे बाजार मूल्य 85 दशलक्ष डॉलरवर पोहचले. Dogecoin.com या चलनाला सातत्याने प्रोत्साहन देत आहे. डोगेकॉईनची व्यवहार प्रक्रिया बिटकॉईनपेक्षा अधिक जलद आहे. डोगेकॉईनला कन्फर्म होण्यासाठी 1 मिनिट लागतो. तर बिटकॉईन यासाठी 10 मिनिटांचा वेळ घेते.

हे सुद्धा वाचा

Doge मीम म्हणजे काय Doge हे एक इंटरनेट मीम आहे. 2013 मध्ये हे खूप लोकप्रिय झाले. या मीममध्ये काबुसो नावाची एक शीबा इनु कुत्रीचे छायाचित्र आहे. हाँगकाँगमध्ये एका 9 वर्षांच्या कुत्र्याचे चित्र व्हायरल झाल्यानंतर याची सुरुवात झाली होती. त्यानंतर कुत्र्याच्या मीम्सचा इंटरनेटवर पाऊस पडला. Shiba Inu जातीच्या कुत्र्याचे हे चित्र होते.

काय आहे भाव

बिटकॉईनची किंमत 23,39,179 रुपये आहे. तर इथेरियमची किंमत 1,56,810 रुपये, डोगीकॉईन 8.3 रुपये, रिप्पल 42.22 रुपये, लाईटकॉईन 7,756.36 रुपये, बिटकॉईन एसव्ही 999.72 रुपये अशी किंमत आहे. बायकॉईनवरुन या किंमती अपडेट करण्यात आल्या आहेत. भारतीय एक्सचेंजनुसार त्याची किंमत आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.